उस्माननगर, माणिक भिसे| बुधवारी मध्यरात्री पासून ढगफुटी सदृश्य परिस्थितीत पडत असलेल्या पावसामुळे उस्माननगर व परिसरातील खरीपाचे पिके आडवी पडली तर काही ठिकाणी वाहुन गेल्याने शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे.


उस्माननगर व परिसरात बुधवारी व गुरुवारी सकाळ पासून ढगफुटी सदृश्य परिस्थितीत पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.तर शेतातील कापूस , सोयाबीन , हाळद , तुर , खरीपाचे पिके आडवी पडली तर काही ठिकाणी वाहुन गेले आहेत. काही ठिकाणच्या छोट्या छोट्या नदी नाल्याना पुर आल्याने गावातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.

अनेक गावात पाणी पाणी साचल्याने बाहेर निघणे मुश्किल बनले आहे.नदीना पुरपरिस्थीती झाली आहे. काल सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवराज अंबाटे , लक्ष्मण डांगे शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.



