मुखेड/नांदेड| मुखेड शहरात श्री विरभद्र मंदीर पासुन ते श्रावण कावडी पर्यंत दि. 26 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 7 वाजता भव्य कावड यात्रेचे आयोजन श्रावणकावडी देवस्थान व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
ही कावड यात्रा मुखेडचे नगरीचे कुलदैवत श्री विरभद्र मंदीर पासुन सकाळी 7 वाजता सुरु होणार असुन शहरातील विविध भागातून ही कावड यात्रा जाणार आहे. शहरापासुन जवळच असलेल्या ऐतिहासिक रामायणकालीन श्रावणकावडी देवस्थान येथे या कावड यात्रेचा समारोप होणार आहे. तत्पुर्वी श्रावण चलम्यातील जल घेऊन श्रावण कावडी येथील महादेवास जलाभिषेक भक्तांच्या कावडने होणार आहे.
श्रावण कावडी येथे मागील एक वर्षापासुन लोकहभागातून श्रावणबाळ व त्यांच्या आई वडीलाच्या मंदीराचे जिर्णोध्दार होत असुन मंदीराचा खुप कायापालट झालेला आहे. श्रावणबाळ,त्यांचे आई वडील, संत गाडगेबाबा व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती मुर्ती सुध्दा आणण्यात आले आहेत. लवकरच श्रावणकावडी येथे भव्य कार्यक्रम घेऊन कळसारोहन होणार असल्याचे देवस्थानने सांगितले.
श्रावण महिण्यात मागील वर्षी सुध्दा भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तर या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकांनी कावडसह हजारो भक्तांनी यावे असे आवाहन श्रावण कावडी देवस्थान व विश्व हिंदु परिषदच्या वतीने करण्यात आले आहे.