हिमायतनगर| हिमायतनगर तालुका हा आदिवासी बहुल भागातील तालुका म्हणून नांदेड जिल्ह्यात परिचित आहे. या तालुक्यातील पंधरा शाळेवर एकही शिक्षक कार्यरत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने वाऱ्यावर सोडले की काय..? असा प्रश्न तालुक्यातील सुजाण नागरिक विचारत आहेत. हिमायतनगर तालुक्याला आठ केंद्र व तीन बीट असल्यामुळे हिमायतनगर येथील शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील 110 शाळांचा कारभार चालविला जातो. त्यामुळे एक जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास भेट देऊन शिक्षकांच्या पदभरती संदर्भात आढावा घेतला. तसेच येथील शिक्षकांच्या जागा तात्काळ भरून तालुक्यातील सर्व शाळांना शिक्षक देण्याचे आदेश दिले.
हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी नैसर्गिक वर्ग खोल्या सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची संकल्पना शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम यांनी राबवली आहे. हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा रिक्त पदांमुळे पालकांच्या रोषासमोर जावं लागतं असल्याची खंतव्यक्त केली. यापुढील होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये हिमायतनगर तालुक्यांतील सर्वच रिक्त पदांसह जिल्हयातील पदे भरणार असल्याचं सांगितलं आहे.
तालुक्यात एकूण 110 शाळावर शिक्षकांसह विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद्दोनत मुख्याध्यापक असे एकूण 437 पदे मंजूर असुन केवळ 296 पदे कार्यरत आहेत तर 141 शिक्षण विभागाच्या जागा रिक्त असल्यामुळे तालुक्यातील जवळपास 15 शाळा शिक्षका विना भरविल्या जात आहे ही खेदजनक बाब नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सविता बीरगे यांच्यासमोर येथील ग्रामस्थांनी व पत्रकारांनी मांडली.
त्यामुळे शिक्षणाधिकारी बिरगे मॅडम यांनी तात्काळ हिमायतनगर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास भेट देऊन हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा सह एकही जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना भरणार नाही अशा सूचना येथील शिक्षण विभागाला दिल्या यावेळीमेकाले सर, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील कोसमेटकर, जानते सर ,पी. एम.पापटवार, गणेश कोकुलवार, डी. एम. धात्रक, श्रीमती एम. बी. बोड्डेवार, पद्माकर कुलकर्णी ,अशोक कपाळे,नामदेव राठोड ,सचिन कळसे, सतिष गोपतवाड, आर.पी.चव्हाण, चिटमलवार, कमठेवाड , नबी सह आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
हिमायतनगर तालुक्यातील नवनियुक्त शिक्षणसेवक सतीश गोपतवाड यांनी केला शिक्षण अधिकारी यांचा सत्कार
हिमायतनगर तालुक्यात नव्यानेच नियुक्त झालेले जि.प.कें.प्रा.शाळा सवना येथील नवनियुक्त शिक्षण सेवक सतीश गोपतवाड यांनी हिमायतनगर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे पवित्र पोर्टल शिक्षक भरती पारदर्शकपणे पार पाडणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी डॉ.सविता बिरगे यांच्याशी तालुक्यातील शिक्षण विभागाच्या असंख्य विषयावर चर्चा करून यथोचित मानसन्मान करून सत्कार केला.