किनवट, परमेश्वर पेशवे। गोकुंदा हददीतील शिवशंकरनगर येथे आज स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ ग्रामस्थांकरीता मोफत सर्वांग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. सर्व प्रथम स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रतिमेचे पुजन त्यांचे पती महाजन मरडे, चिरंजीव आनंदा, संजय, गुरुनाथ मरडे, सूना सुलोचना, अर्चना, सुरेखा मरडे, त्यांचे नातू संदिप, गणेश मरडे यांनी केले. यानंतर कार्यक्रमात मरडे कुटुंबिय व भारत जोडो युवा अकादमी साने गुरुजी रुग्णालय, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज सेवक डॉ. अशोक बेलेखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी, गरोदर माता, बालके, वयोवृद पुरुष व महिला, किशोर वयीन मुली असे एकूण 51 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधी, गोळया वाटप करण्यात आले.
सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मार्तंड कुलकर्णी, भारत जोडो युवा अकादमी साने गुरुजी रुग्णालय, किनवट येथील भारती साबळे, डॉ. प्रगती पवार, दंत रोग तज्ञ डॉ. मानसी व्यवहारे व किनवट येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ. आर्विद भुरके यांच्या हस्ते उपस्थित शेतकरी यांना विविध फळझाड रोपांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमात पाहणे श्रीमती भारती साबळे यांनी उपस्थित महिला, पुरुष, किशोर वयीन मुली, माता, गरोदर महिला, स्तनदा माता, युवक यांना महिलांच्या आरोग्याची स्थिती व त्यांना जाणवत असलेल्या समस्या लक्षात आनुण दिले.
महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत: घेतली पाहिजे. कामाच्या ओघात महिला स्वत:चे खाणे, पिणे याकडे दुर्लक्ष करतात. समाजात महिला अत्यंत महत्वाच्या आहेत. समाजाचा महत्वाचा घटक आहेत. त्या आजार अंगावर काढतात, घरचा उपचार घेतात, त्यांचा आजार घरगुत्ती उपायाने बरा होतो पण काही वेळा तो हाताबाहेर जातो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर मोठा परीणाम पडतो, परीणामी त्यांना त्यांचा जीव गमावावा लागतो हे अनेक गावातून घडल्याचे अनुभव या प्रसंगी श्रीमती साबळे यांनी उपस्थितांच्या लक्षात आनुण दिले.
संजय मरडे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय अनुसयाबाई यांच्या प्रथम पुण्य समरणार्थ आज या ठिकाणी समाजाच्या चालत आलेल्या सर्व रुढी, प्रथा व परंपरा यांना बदल देउन आपणा सर्वासाठी सर्वांग आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करुन समाजाला एक नवा मार्ग या ठिकाणी त्यांनी दिला आहे. आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती या प्रसंगी त्यांनी केली व या शिबीराचे आयोजन केल्या बददल मरडे कुटूंबियांचे त्यांनी तोंड भरुन कौतूक या प्रसंगी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ शेतकरी लक्ष्मणराव केंद्रे, बाबु मुंढे, बळीराम साखुळे, मारोती नरबा कागणे, गणपती गीते, हानमंत कोतुरवार, संजय पाटील, विना ढवळे, भारतबाई केंद्रे, तानाजी यादवकर, हानमंतू कोतूरवार, प्रा. संजय पाटील, राम मुंढे, ओंमकार साकुळे, गोपीनाथे केंद्रे, प्रविण वाठोरे, दयानंद बेंबळगे, माजी सरपंच प्रविण म्याकलवार, बबलू राठोड, पदमाबाई मुंढे, जनाबाई मुंढे, भारतबाई बेंबळगे, गंगाबाई मुंढे, सुमनबाई यादवकर, सिंदूबाई तिरमलदार, सरस्वतीबाई यादवकर, नागीनबाई साकुळे, शिवलिला साकुळे, गंगुबाई गिते, गिन्यानबाई कागणे, डॉ. साक्षी चोपडे, डॉ. उर्वी रुपारेल, डॉ. आर्विंद शेडगे समाजकार्य प्रशिक्षणार्थी सयमक जोगदंड, पवन तुपसमुंद्रे आणि डॉ शिवाजी गायकवाड यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानव लोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई येथील समाजकार्य प्रशिक्षणार्थी अक्षय तौर यांनी सुत्रसंचालन केले तर उपस्थितीतांचे संजय मरडे यांनी आभार मानले.