किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यातील शिवाच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्यातील मौजे टेंम्बी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास प्रेमसिंग खसावत यांची संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
ग्राम विकास विभागाच्या संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी बाबत बंजारा/लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचात स्थापन करण्याची कार्यवाही करणे इत्यादी व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत प्रतिनिधी- अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे. परंतु बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने सदर अशासकीय सदस्यांची नेमणूक शासन स्तरावरुन करणे आवश्यक आहे.
ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समितीत अशासकीय सदस्यांची 3 वर्षाकरीता नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून कैलास प्रेमसिंग खसावत यांची निवड करण्यात आली आहे. तसे अधिकृत पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
त्यांच्या या निवडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, आरोग्य दूत रामेश्वर नाईक, खा. डॉ. अजित गोपछडे, डॉ. सचिन उमरेकर, आ. भीमराव केराम, भगवती प्रसाद, धनुसिंग डांगरे, रमेश पडवळे, गणेश चव्हाण, जयराम लिकडे, रामजी राठोड, ज्योतीबा मंदलवार, दिनेश नाईक, भरत नाईक, दिदारसिंग नाईक, अनिल टेकाम, मंगेश तितरे, धनुसिंग डांगरे, विवेक खसावत, लवकुश जाधव यांच्यासह टेंम्बी तांडावासीय, परिवार व नातेवाईकांतून अभिनंदन होत आहे.