नांदेड| तण व्यवस्थापन उपायांसाठी जागरुक बनिये, पायना चुनिये या टॅगलाइनसह एका आकर्षक मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रभावी तण व्यवस्थापन आणि उत्तम पिकासाठी तणनाशकाची खरेदी करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पायना मार्क शोधण्याची सवय लावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
महाराष्ट्रात कापूस पेरणीचा हंगाम सुरू झाल्याची योग्य वेळ साधत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. योग्य तणव्यवस्थापन उपाय निवडताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडची ही मोहीम प्रकाश टाकते.तसेच बियाणे पेरण्यापासून सक्रिय फुलोरापर्यंत तणव्यवस्थापनाचे विस्तृत पर्याय उपलब्ध करून देणे, पिकाची अवस्था, पीक-तण स्पर्धा कमी करणे आणि कपाशीच्या मजबूत वाढीस चालना देणे यासाठी देखील उत्पादनांचा पायना ब्रँड सक्रिय आहे.
या मोहिमेवर भाष्य करताना, अनिल चौबे म्हणाले, “पिकांमधील अंतर जास्त असल्याने कापसावर तणांचा 45-50 टक्के पर्यंत परिणाम होतो. यासाठीच आम्ही डिजिटल मोहीम चालवतो आहोत. प्रभावी तण नियंत्रणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आमच्या नाविन्यपूर्ण उपायांसह सक्षम बनण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादनांचा पायना निवडावा. कमी परिणामकारक पर्यायी उपाय निवडू नयेत. पायना च्या साहाय्याने शेतकरी पीक-तण स्पर्धा कमी करू शकतात. कापसाचे मजबूत पीक घेऊ शकतात. आणि त्यांचे उत्पन्न आणि नफा जास्तीत जास्त वाढवू शकतात.”“माहितीचा एक मजबूत स्रोत म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्म हा शेतकरी समाजामध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे नवीन काळातील या व्यासपीठाचा फायदा घेऊन, आम्ही आमच्या कापूस शेतकऱ्यांशी मजबूत संबंध निर्माण करतो आहोत.