Homeछत्रपती संभाजीनगरG. Srikant : एसआयआरच्या कामाचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला आढावा

G. Srikant : एसआयआरच्या कामाचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला आढावा

मतदार यादी अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर| भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करून प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी रणजीत पाटील, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मंजुषा मिसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, तहसीलदार के. के. भदाने यांच्यासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बीएलओ यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळणे, गणना फॉर्म काळजीपूर्वक व अचूकपणे भरणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करून प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करणे आणि कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

जी. श्रीकांत म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे. अपात्र नोंदी नियमानुसार व वेळेत वगळाव्यात, तर पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामात कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी प्रत्येक स्तरावर प्रभावी समन्वय राखावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

WhatsApp Image 2026 07 21 at 6.21.41 PM G. Srikant : एसआयआरच्या कामाचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला आढावा

बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखा, तहसील प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून निर्धारित वेळापत्रकानुसार सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत. तसेच प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले.

मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. બેઠકकीस एसआयआरशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments