हदगाव, शेख चांदपाशा| गणेश उत्सवाच्या,पार्श्वभूमीवर दरवर्षी हदगाव पोलिस स्टेशनद्वरे शांताता कमेटीचे आयोजन करण्यात येते. माञ यावर्षी स्थानिय पोलिस स्टेशनने नवीनच पायंडा घातल्याचे दिसुन आले.
दरवर्षी सर्व समाजातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे स्थानिय राजकीय नेते यांना निमंञित करण्यात येते. पोलिस प्रशासना तर्फ उपविभागीय अधिकारी सह पोलिस दलातील वरिष्ठ आधिकारी नगरपरिषद सार्वजनिक बाधकाम अभियता, सरकारी रुग्णालयाचे डाँक्टर, महावितरण कंपनीचे अधिकारी हे शांताता बैठकीला आवर्जून हजर आसतात. विशेष म्हणजे ह्या शांताता बैडकीतच काही नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते व पञकार गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इतर धर्मीयाच्या सणाच्या अनुषंगाने सामाजिक दृष्टिकोनातून सुचना करित असतात.
तिथेच संबंधित विभागाकडुन सुचनांचे निरकान होते व कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने पण ह्या सुचना फार उपयोगी असतात. सर्वात शेवटी विविध प्रशासकीय आधिका-यासह वरिष्ठ पोलिस अधिका-याच ह्या बैठकीला मार्गदर्शन होते. परंतु ह्यावर्षी काही तरी बदोबस्तची कारणे देवुन हदगाव पोलिस स्टेशन प्रशासनाने नवीनच पायंडा पाडल्याच दिसुन येत आहे. काही ठराविक लोकाना बोलावून व युट्युब माध्यमाद्वरे नागरिकाना शांतातेच अहवान करुन घाईघाईने शांताता बैठक उरकल्याने शहरातील व परिसरातील नागरिकात स्थानिय पञकारात पोलिस प्रशासनाच्या अश्या भुमिकेमुळे नाराजी पसरली आहे.
मी बदोंबस्तात होतो – पोलीस निरक्षक राजेश पुरी
देशाच्या राष्ट्रपती व काही राजकीय नेत्याचा दौरा नादेडला असल्याने मी बदोबस्ता करिता बाहेर गावी होतो. शांतता कमेटीच्या बाबतीत फारशी माहीती नसल्याचे पोलिस निरक्षक राजेश पुरी यांनी सागितले. या बाबत शुक्रवारी काही स्थानिय पञकारांनी पोलिस निरक्षकांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर स्थानिय पोलिस स्टेशनने घेतलेल्या शांताता कमेटीच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते व्यापारी काही विविध राजकीय पक्षाचे स्थानिय नेते स्थानिय पञकार यांना प्रथमच डावल्याचे दिसुन आले.