नवीन नांदेड| उच्च शिक्षित तरूण असलेल्या व सिडको भागात मोरया हॉटेल व्यावसायिक असलेल्या उच्चशिक्षित युवक कृष्णा विजयेंद्र चाभरेकर पाटील यांनी स्वबळावर तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मोठ्या प्रमाणात नांदेड शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी होत असून स्वबळावर या युवकांनी कोणाची मदत न घेता हे मिश्रण तयार केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात व विविध विभागात मोठ्या प्रमाणात नामकिंत कंपन्यांनी मोठे मोठे चहाच्ये हॉटेल टाकून व्यवसाय चालू केले यास ग्राहकांनी प्रतिसाद दिला. नवीन नांदेड भागातील अण्णाभाऊ साठे पुतळा या भागात उच्चशिक्षित युवक असलेला कृष्णा विजयेंद्र पाटील चाभरेकर यांनी नौकरी मागे न लागता आपला व्यवसाय म्हणून मोरया हॉटेल गेल्या तीन वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला. गुळाचा व साखरेचा चहाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
दैनंदिन चारशे ते पाचशे कप चहाची विक्री शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, बॅक, यासह युवक व ग्रामीण भागातील अनेकांनी अस्वाद घेत अल्प कालावधीत लोकप्रियता मिळविल्या नंतर आपण ही गुळाचा चहा मध्ये बदलाव करत स्वबळावर खुली चहापती, खुले गुळ पावडर, व विविध नेसर्गिक वनस्पती असलेल्या मिश्रण करून पावडर तयार केली असून एका कपासाठी दोन चमचे पावडर असे टाकावयाचे असून अन्न व औषध प्रशासन विभागा सह व्यावसाय परवाना ईतर लागणार या परवानगी घेण्यात आली आहे.
सदरील मिश्रणात टाकण्यात येणाराय वनस्पती हया आरोग्यासाठी उपायकारक आहेत. सदरील मिश्रण २०० व ५०० ग्रॅम, व एक किलो मध्ये उपलब्ध केले असून स्वता:ह नांदेड शहर व जिल्ह्यात तालुक्यातील अनेक गावातील हॉटेल व्यावसायिक यांनी पसंती दिली असून स्वबळावर केलेल्या या व्यवसायाला अनेक मित्र मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.