नांदेड/नायगांव| भाजपा महायुती सोबत गेल्या वर्षापासून शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना काम करत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये नायगांव विधानसभामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेणारे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर कार्य करत आहेत.
महायुतीकडून नायगाव विधानसभेसाठी विद्यमान आमदार राजेश पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आज नायगाव तहसील कार्यालय विधानसभेचे दोन अर्ज खरेदी केली आहेत.
पांडुरंग शिंदे यांनी जर विधानसभेसाठी अर्ज भरला तर महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे? रयत क्रांती संघटना आणि शेतकऱ्याची ताकत पांडुरंग शिंदे यांच्यामागे उभी राहिली तर निश्चितच महायुतीचे उमेदवार राजेश पवार यांना ही निवडणूक जड जाईल असे जाणकाराचे मत आहे.
नायगाव मतदारसंघातील शेतकरी,शेतमजूर व युवा मित्रांशी आणि आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत यांच्याशी विचारविनिमय करून विधानसभेचे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. पांडूरंग शिंदे, रयत क्रांती संघटना (युवा)