लोहा| धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.क्रांतिसूर्य बुद्ध विहार,ज्ञानदीप बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार , जायकवाडी कॅम्प येथे पंचशील व निळा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले खीरदान करण्यात आली .
शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने क्रांतिसूर्य बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे ,तालुकाध्यक्ष बापूसाहेब कापुरे याच्या हस्ते पंचशील व निळया ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले पूजापाठ धोंडिबा एनभूरे यांनी केले.
जुन्या शहरातील त्रिरत्न बुद्ध विहारात माजी नगरसेवक उत्तम महाबळे , मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली सिद्धार्थ महाबळे ,रवी महाबळे यांनी खीर दान केले जायकवाडी कॅम्प येथे बी बी गायसमुद्रे याच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.ज्ञानदीप बुद्ध विहारात माजी सैनिक रावसाहेब हणवते व ज्ञानोबा हनवते याच्या पंचशील व निळा ध्वजारोहण हस्ते करण्यात आला
पूजापाठ ज्ञानोबा ढवळे गौतम गोडबोले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कचरे, पाईकराव , आर जी वाघमारे यांनी केले.
बोधिसत्व प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यास माजी खासदार प्रतापराव पाटील यांनी।अभिवादन केले तत्पूर्वी दसरा व विजयादशमी निमित्ताने लोह्यात त्याचे आगमन झाल्या नंतर प्रतापरावांनी छत्रपती_शिवाजी_महाराज। याच्या पुतळ्यास प्रथम अभिवादन केले त्यानंतर धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ_बाबासाहेब_आंबेडकर याच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच महात्मा बसवेश्वर . याच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलेभाजपाचे जेष्ठ नेते केरबाजी बिडवई याच्या बिडवई डेव्हलपर्स ऑफिसला भेट दिली. माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी याच्या कार्यालयात दसरा निमित्ताने गेले तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला .माजी नगरसेविका राहीबाई खिल्लारे यांच्या निवासस्थानी गेले तेथे केतन खिलारे, प्रशांत खिल्लारे यांनी सत्कार केला.
शहरातील पुतळ्यास अभिवादन करताना माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धूतमल तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे माजी नगरसेवक भास्करराव पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मिलिंद पवार, , दीपक कानवटे, वीरभद्र राजुरे,अविनाश पवार, बाळू पवार, केशव पवार सचिन मुकदम, प्रवीण धुतमल,,सूर्यकांत पार्डीकर ,याची उपस्थिती होती.