Wednesday, May 27

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

eco-friendly Ganeshotsav ; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

eco-friendly Ganeshotsav ; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

धार्मिक, नांदेड
नवी दिल्ली| महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी भेट देऊन पाहणी केली. यंदा 'गणेश उत्सव' हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत मराठी तसेच मराठी भाषिक भाविकही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाकडून दरवर्षी पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींचे विक्री प्रदर्शन लावण्यात येते. ही खुप समाधानाची बाब असल्याचे नमूद करून श्रीमती विमला यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. शाडू मातीच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाशी आपली नाळ घट्ट राहावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमती विमला यांनी श्री. शिंदे यांच...
Osmannagar Police ; वाळू उपसा करणाऱ्या २ क्रेन जप्त; ४ जणांवर गुन्हा उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

Osmannagar Police ; वाळू उपसा करणाऱ्या २ क्रेन जप्त; ४ जणांवर गुन्हा उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून उस्माननगर पोलीस पथकाने वाळुसह २ क्रेन जप्त केल्या आहेत. यावेळी दोन बोट चालक बोट घेऊन फरार झाले आहेत . उस्मान नगर पोलीस ताण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलिस हवालदार गंगाधर चिंचोरे, तुकाराम जुन्ने, प्रकाश पेदेवाड व होमगार्ड याचे पथक शीघ्र मोहिमेवर होते. २१ ऑगस्ट रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या वर छापा टाकला. पोलिसांना पाहताच्च २ बोट मालक गोदावरी नदी पात्रातून बोटी घेऊन पळून गेले. यापेळी पथकाने १० ब्रास वाळू (४२ हजार रुपये) २ क्रेन ४५ लाख रुपये जप्त केले.  पथकाने मुखेड तालुक्यंतील खैरका येथील क्रेन चालक व मालक पांडुरंग गोविंद मोरे, हैदराबाद र...
Pola festival ; उस्माननगर परिसरात पोळा सण उत्साहात साजरा सर्जा राजाची संख्या दिवसेंदिवस कमी

Pola festival ; उस्माननगर परिसरात पोळा सण उत्साहात साजरा सर्जा राजाची संख्या दिवसेंदिवस कमी

कृषी, नांदेड
उस्माननगर l 22 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या बैलांना पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत मारुती मंदिराजवळ आणून येथील मानकरी आनंदराव रावसाहेब पाटील घोरबांड, अशोक शंकरराव पाटील घोरबांड यांनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ, फोडून गुलाल , मुरमुरे उधळून पोळा सणास सुरूवात करण्यात आली. भारत हा आपला शेतीप्रधान देश म्हणून ओळख आहे. शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्त्व आहे बैला प्रति कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण पिठोरी अमोशाला साजरा केला जातो . बैलांना सजवून गावातील मारुती मंदिराच्या गोल फेरी मारून नंतर तोरण तोडण्यात येते. श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी इत्यादी सण आटोपलेली असताना , श्रावण महिन्यात शेवटी अमावस्येच्या दिवशी येतो तो सण म्हणजे सर्जा राजाचा पोळा या दिवशी बैलाचा थाट असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन दिले जाते . या दि...
Nanded news : मिल्लत नगरमध्ये वीज संकट आणि अनियमितता, नागरिकांचा वीज विभागाविरुद्ध रोष

Nanded news : मिल्लत नगरमध्ये वीज संकट आणि अनियमितता, नागरिकांचा वीज विभागाविरुद्ध रोष

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगरमधील नागरिक सध्या वीजेच्या समस्येमुळे आणि वीज विभागाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे खूप त्रस्त आहेत. स्थानिकांनी वीज कर्मचाऱ्यांवर, विशेषतः मालटेकडी सबस्टेशनमधील कनिष्ठ अभियंता आणि एका लाइनमनवर गंभीर आरोप केले आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, हे लोक स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांना धमकावून बेकायदेशीरपणे पैसे गोळा करत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या भागातील नागरिक सततच्या वीज कपातीमुळे हैराण झाले आहेत. डीपी क्रमांक 552 तीन वेळा बदलूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी तर तब्बल २९ तास वीज गुल होती आणि एक दिवसाच्या अंतराने आज पुन्हा संपूर्ण परिसर अंधारात आहे. या समस्येबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, ते लोड जास्त असल्याचे आणि वीज चोरीचे कारण देत टाळाटाळ करतात. त्यांचे म्हणणे आहे की, काही लोक आकडा टाकून वीज चोरत आहे...
Pola festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोळा सण उत्साहात साजरा

Pola festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोळा सण उत्साहात साजरा

नांदेड, कृषी
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या 39 गावात शेतकरी राजाने जल्लोषात ढोलताशांच्या गजरात व गावातील हनुमान मंदिरात प्रदक्षिणा मारून अनेक गावांत सामुदायिक मंगलाष्टके म्हणुन सामुदायिक लग्न सोहळा,आरती करून साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,प्रतिष्ठित नागरीक, पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष, यांच्या सह महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैलपोळा सणाच्या निमित्ताने 22 ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतअसलेल्या तुप्पा, जवाहरनगर, भायेगाव, वाजेगाव, कांकाडी, नागापूर,राहेगाव,वांगी,पुणेगाव, वाडीपुयड, वसरणी, असरजन,वाघाळा, असदवन, पिंपळगाव ,यासह जवळपास 39 गावात विधीवत पुजन करून सामुदायिक लग्न सोहळा,महाआरती ने बैलपोळा सण ऊत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड तालुक्यातील सा...
Gajanan Patil ; गोदावरी अर्बन बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

Gajanan Patil ; गोदावरी अर्बन बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

नांदेड
नवीन नांदेड l सिडको येथील गोदावरी अर्बन बँक शाखेचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट आधिकारी म्हणून 12व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष आ.हेमंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गोदावरी अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा 16 ऑगस्ट 25 रोजी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते 12 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन झाले तर संस्थापक अध्यक्ष आ.ना.हेमंत पाटील, संस्थाअध्यक्ष सौ.राजेश्री ताई पाटील, उपाध्यक्ष सौ.हेमलता देसले,सचिव रविंद्र रगटे, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर ,नांदेड दक्षिण माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे , साहित्यिक सुरेश सावंत,व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत नांदेड येथील भारत इ स्केवर नांदेड पाच राज्यांतील शाखेच्या जवळपास अधिकारी व कर्मचारी यांच्यी उपस्थितीती होती. यावेळी सि...
CIDCO ; सिडको गुरूवार बाजार येथे भव्य शिवपुराण शिवकथेचा भाविक भक्तांनी घेतला लाभ,संत महंत यांच्यी तुला

CIDCO ; सिडको गुरूवार बाजार येथे भव्य शिवपुराण शिवकथेचा भाविक भक्तांनी घेतला लाभ,संत महंत यांच्यी तुला

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सिडको गुरूवार बाजार येथे श्रावणमास निमित्ताने 15 ते 21ऑगस्ट दरम्यान शिवकथाकर भागवतचार्य हभप अंकिताताई खांडगे यांचे शिवपुराण कथेस भाविक भक्तांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला, शेवटच्या दिवशी संत महंत यांच्या तुला करण्यात आलीतर महाआरतीने या कथेची सांगता करण्यात आली, यावेळी महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला. दि. 15 ते गुरुवार दि. 21 ऑगस्ट 25 दरम्यान श्रावण मासा निमित्त भव्य शिवमहापुराण (शिवकथा) व अष्टोत्तर सहस्त्रधारा रुद्राभिषेक, सव्वा लक्ष बिल्वार्थना, महामृत्युंजय स्वाहाकार होमहवन, व गुरुवर्याचे तुलाभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,गुरुपुष्य अमृत योगावर परम पुज्य गुरुवर्यचे तुलाभार दिनांक २१ ऑगस्ट गुरुवार सकाळी ११ वाजता व अष्टोत्तर सहस्त्रधारा रुद्राभिषेक सकाळी 8 ते 9 महामृत्युंजय स्वाहाकार होम हवन 9 ते 10, प्रसाद सकाळी 11 ते 12, शिवमहापुराण (शिवकथा) दुपारी 1 ते ...
Eng. Chandraprakash Deglurkar ; इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार !

Eng. Chandraprakash Deglurkar ; इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार !

नांदेड, करियर
नांदेड l अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते, सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक प्रखर व्याख्याते व पत्रकार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. ओबीसी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दरवर्षी एका व्यक्तीस नांदेड जिल्हा ओबीसी भूषण मित्र पुरस्कार देण्यात येतो. २०२४ यावर्षीच्या पुरस्कारासाठी साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी कर्मचारी समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. जी. माचनवार, जिल्हा सचिव रविंद्र बंडेवार तसेच इंजि. लक्ष्मण लिंगापुरे, प्रा. दिलीप काठोटे, सतीशचंद्र शिंदे आणि राजेश चिटकुलवार यांनी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या विजयनगर नांदेड येथील निवासस्थानी जाऊन पुरस्कार निवडीचे पत्र देऊन सन्मान केला. ओबीसींचे जनजागरण, प्रबोधन व मंडल आयोग चळवळीत केलेल्या कार्याची दखल घेऊन हा ...
Baliraja’s Pola celebrated : हिमायतनगर शहर व तालुक्यात बळीराजाचा पोळा अतिवृष्टीच्या – दुष्काळाच्या छायेतही उत्साहात साजरा

Baliraja’s Pola celebrated : हिमायतनगर शहर व तालुक्यात बळीराजाचा पोळा अतिवृष्टीच्या – दुष्काळाच्या छायेतही उत्साहात साजरा

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| अतिवृष्टीच्या संकटाने सर्व काही नष्ट होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही भारतीय परंपरेनुसार साजरा होणारा वृषभराजाचा पोळा हिमायतनगरात उत्साहात पार पडला. नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची मिरवणूक ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातुन काढण्यात आली. शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावास्येनिमित्त पोळा सण पार पडला. सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना स्नान घालून रंगीबेरंगी सजावट केली होती. वार्निश, घुंगरमाळ, झुली, कासरे, गोंडे आदी सजावटींनी सजलेले बैल गावोगावी व शहरात आकर्षण ठरत होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने सडा-संमार्जन करून शेतीअवजारे आणि पळसाच्या मेढ्याची पूजा-अर्चना केली. सायंकाळी 4 वाजता नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांनी मानाच्या बैलांची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात केली. जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेत मिरवणूक श...
Success : करंजी येथील विजयमाला कदम हिचे TAIT परीक्षेत यश

Success : करंजी येथील विजयमाला कदम हिचे TAIT परीक्षेत यश

करियर, नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील विजयमाला जयवंतराव कदम हिने शिक्षक पदासाठी झालेल्या TAIT परीक्षेत तब्बल 146 गुण मिळवत गाव, कुटुंब व गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. विजयमालाचे शैक्षणिक पात्रता उल्लेखनीय आहे. तिने एम.ए. अर्थशास्त्र (सेट – अर्थशास्त्र), एम.ए. मराठी, बी.एड., एम.एड. तसेच CTET पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामागे परिश्रम, गुरुजनांचे मार्गदर्शन व परिवाराचे आशीर्वाद हेच बळ ठरले. या यशानिमित्त करंजी येथील मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी सर व कै. श्री. दे. वी. सरसम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावचे पोलिस पाटील बापूराव मिराशे, कापसे गुरुजी तसेच नवोदय क्लासेस, हिमायतनगरचे मार्गदर्शक प्रा. सज्जन कदम (ॲडव्होकेट) उपस्थित होते. सत्कार सोहळ्यावेळी विद्यार्थिनीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तर गुरूंच्या डोळ्यांत अभिमानाची चमक दिसून आल...
error: Content is protected !!