Tuesday, May 19

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Three accused who stole from the bank’s ATM were taken into custody : किनवटच्या भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना 15 लक्ष 60 हजार 500 रुपयाचा मुददेमालसह घेतले ताब्यात -NNL

Three accused who stole from the bank’s ATM were taken into custody : किनवटच्या भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना 15 लक्ष 60 हजार 500 रुपयाचा मुददेमालसह घेतले ताब्यात -NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| जिल्हयात मालाविरुध्दचया गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस स्टेशन किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 15 लक्ष 60 हजार 500 रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पो.स्टे. किनवट गुरनं 235/2024 कलम 303(2),306 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या ATM मशीन मधील 500 रुपये दराच्या 3479 नोटा ज्याची एकूण रक्कम 17,39,500 रुपये अज्ञात चो...
A speeding car hit the bike hard : भरधाव वेगातील कारची दुचाकीला जबर धडक; सरसम येथील शेतकरी आनंदराव मिराशे यांचा मृत्यू -NNL

A speeding car hit the bike hard : भरधाव वेगातील कारची दुचाकीला जबर धडक; सरसम येथील शेतकरी आनंदराव मिराशे यांचा मृत्यू -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु. गावाजवळ दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कारणे दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना आज दिनांक १० रोजी सकाळी घडली आहे. या घटनेत आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या रस्त्यावरून भरधाव वेगात वाहने चालविली जात आहेत. तर अनेक महत्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने भोकर हिमायतनगर या रत्स्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील किराणा दुकानदार तथा सधन शेतकरी हे आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव वेगात पाठीमागून येणाऱ्या MH14 - C9472 कारणे दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. या कार दुचाकी अपघातात सरसम नजीक त्यांच निधन झाल. अपघात घडताच तात्काळ नागरि...
attempted murder : हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला – NNL

attempted murder : हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला – NNL

क्राईम, नांदेड
बिलोली/नांदेड। नांदेड जिल्ह्यालील बीलोली तालुक्यातील मौजे अंजनी येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. हत्येचा प्रयत्न प्रकरणातील दोन आरोपींचा नियमीत जामीन अर्ज बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही. बी बोहरा यांनी शुक्रवारी फेटाळला. मौजे. अंजनी ता. बिलोली जि. नांदेड येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झालेला होता. त्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादेवरून चार जणांविरूध्द पोलिस ठाणे बिलोली येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(२), ११९(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद क. १६३/२०२४ हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर सदर गुन्हयात भारतीय न्याय संहिता चे कलम ११९ (२) व ६१ (२) हे नव्याने समाविष्ठ करण्यात आले होते. त्यावरून ३ आरोपी...
Abinash Kumar appointed as Nanded District Superintendent of Police : नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी अबिनाशकुमार यांची नियुक्ती -NNL

Abinash Kumar appointed as Nanded District Superintendent of Police : नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी अबिनाशकुमार यांची नियुक्ती -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेड येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांची पदोन्नती देऊन नांदेड पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नांदेड पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेड येथे मागील दोन वर्षांपासून कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यावर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यासोबतच पुणे वाहतूक शाखेत उपायुक्त असलेले विजय कुमार मगर यांना लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून तर अमरावती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यावर बीड पोलीस अधीक...
Sub Divisional Officer Sangewar : उपविभागीय अधिकारी संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येळी घाटावरील वाळू माफियावर धडक कारवाई -NNL

Sub Divisional Officer Sangewar : उपविभागीय अधिकारी संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येळी घाटावरील वाळू माफियावर धडक कारवाई -NNL

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी नदी घाटावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या ‌माहितीवरून कंधार उपविभागीय अधिकारी ‌अरुणा संगेवार यांचे मार्गदर्शन खाली‌ महसूल ‌पथकाने धडक कारवाई करत अवैध वाळू उपसा करून दोन जेसीबी मशीने‌ दोन टिप्पर भरताना पकडून दंडात्मक कारवाईसाठी उस्माननगर पोलीसाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. लोहा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले व शेवटच्या टोकावरील येळी‌ पुला लगत अवैध वाळू उपसा सुरू होता. त्यावरून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी अचानक बुधवारी सांयकाळी लोहा महसूलचे धडक कारवाई पथकाने अवैध वाळू उपसा करून दोन जेसीबी मशीनने टिप्पर ‌मध्ये भरताना दोन‌ जेसीबी‌ मशीन‌ व दोन‌ वाहने पकडली. त्यात टिप्पर‌ क्रमांक एमएच २६/एडी‌ १०५२ व‌ एमएच ०४/ईवाय ७९४७ ही वाहने पुढील दंडात्मक कारवाई होई पर्यत उ...
Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

Blog, क्राईम, नागपूर
हिमायतनगर। तालुक्यातील वडगाव शिवारातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सात पोलचे नुकसान करून विद्युत वापराचा जरमन तार चोरून नेला आहे. हि घटना दि. ५ च्या मध्यरात्री घडली असून दि. ६ मंगळवारी सकाळी ही चोरीची उघडकीस आली आहे. तालुक्यातील वडगाव शिवारात विद्युत महावितरण कंपनीकडून पोल उभारणीचे काम सुरू आहे. या दरम्यान कामांसाठी पोल जरमन तार व इतर साहित्य घटनास्थळी टाकण्यात आले होते. व काहिं उभारण्यात आले होते. या दरम्यान रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सात पोलचे नुकसान करून, विद्युत कंपनीचे पोलवरील जरमन वायर अंदाजे किंमत २५ हजारांचा माल चोरून नेला आहे. सकाळी हि चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश कळसकर वय ३० वर्ष व्यवसाय महावितरण कंपनीत नौकरी यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून गुरन. २०४/२०२४ कलम ३०३, ( २ ), ३२...
विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील सार्वजनिक बांधकाम विगाग कार्यालयानजीक शासकीय विश्रामगृहा जवळ विना परवाना दोन जनावरांना घेवून वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडी पोलीसांनी पकडली. हि कारवाई दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील किनवट, नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, शासकीय विश्रामगृहासमोर एक टाटा मॅजिक गाडी एम. एच. २६ बी. ई. ८३७९ किंमत ४ लक्ष रूपयांच्या गाडी मध्ये दोन जनावरे अतिशय क्रूरपणे, त्यांच्या जीवितास इजा पोहचण्याचा इराद्याने व तसेच कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलीसांनी पकडले. हि कारवाई सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान करण्यात आली असून दोन जनावरे किंमत १६ हजार वाहनाची किंमत ४ लाख रूपये असा एकूण ४ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. हिम...
Two inveterate criminals in jail for one year under MPDA : दोन अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात – NNL

Two inveterate criminals in jail for one year under MPDA : दोन अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 38 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये सन 2023 मध्ये 26 टोळ्यामधील 76 इसमांना व सन 2024 मध्ये 6 टोळ्यामधील 22 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 17 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठाणे इतव...
The father is in police custody : २५ दिवसाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या त्या पित्यास पोलीस कोठडी – NNL

The father is in police custody : २५ दिवसाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या त्या पित्यास पोलीस कोठडी – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एका २५ दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देऊन पुरावा नॅश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पित्यास देगलूर न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडा सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले. या संबंधातून तिला २५ दिवसापूर्वी मुलगी झाली. या मुलीच्या पालन पोषणाच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्याघरात भांडण सुरू झाले. अखेर संतप्त झालेल्या शेषराव भुरे याने २५ दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. आणि तिचा मृतदेह पिशवित टाकून लेंडू नदीच्या पात्रात फेकून दिला. ०४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास बागा टाकली जवळील लेंडी नदीच्या पात्रात एका स्त्री जातीचे अभ्रक मयत अवस्थेत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली....
The theft session continues in Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; वडगाव ज.परिसरात एकच दिवशी तीन ठिकाणी चोरी – NNL

The theft session continues in Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; वडगाव ज.परिसरात एकच दिवशी तीन ठिकाणी चोरी – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज. भागात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने दोन शेतीच्या आखाड्यावर आणि एक हॉटेलवर चोरी करून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी वृत्त लिहीपर्यंत कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. हिमायतनगर शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरूच आहे. हिमायतनगर पोलीस चोरीच्या घटनाना आवर घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील चोऱ्याचे सत्र सुरूच असल्याने चोरटयांनी एक प्रकारे पोलिसांना पकडण्याचे आव्हानच दिले कि काय..? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. हिमायतनगर शहरात घडलेल्या दोन चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश करून चोरट्यांच्या मुचक्या आवळल्या होत्या. त्यानंतर मागील सहा महिण्यापुर्वीच्या दरोड्यातील फरार तीन आरोपीना पोलिसांनी जेरबंद करून आपली चुणू...
error: Content is protected !!