Monday, May 18

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

MPDA for one year : आणखी एका सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले ” स्थानबध्द”

MPDA for one year : आणखी एका सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले ” स्थानबध्द”

क्राईम, नांदेड
नांदेड| अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सूज्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन्, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना ( MPDA for one year) करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदाराकडून गुन्हेगाराना स्थानबद्ध करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. MPDA अंतर्गत सन 2024 मध्ये एकुण 13 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारानों कारागृहामध्ये "स्थानबध्द" करण्यात आले असून चालू वर्षामध्ये अतिष गंगाधर शिंदे या सराईत गुन्हेगारास कारागृहामध्ये 'स्थानबध्द करण्यात आले आहे. तसे...
Mobile Forensic Van : गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mobile Forensic Van : गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्राईम, मुंबई
मुंबई| भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ' मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' (Mobile Forensic Van) ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काढले. सह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ पूर्णपणे ...
Atrocity act ; ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा

Atrocity act ; ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा

नांदेड, क्राईम
नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवशीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एकदिवसीय प्रबोधन पर कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र जाधव प्र. पोलीस अधीक्षक (नांहस ) परिक्षेत्र  नांदेड होते .तर उद्घाटक  अभिजीत राऊत (भा.प्र.से) जिल्हाधिकारी नांदेड हे होते .तर प्रमुख पाहुणे डॉ. अश्विनी जगताप (डी वाय एस पी) नांदेड ,श्रीमती छाया कुलाल सदस्य सचिव तथा उपयुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड  श्रीमती शफकत आमना,सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर हे प्रमुख पाह...
The condition of two hunger strikers : एकंबा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी सुरु असलेल्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

The condition of two hunger strikers : एकंबा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी सुरु असलेल्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| एकंबा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी सुरु असलेल्या दोन उपोषणकर्त्यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली (The condition of two hunger strikers) आहे. त्या दोघांना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, आज उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे. जर कार्यवाही नाही झाली तर चौकशीच्या नावावर दिशाभूल करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी कागदोपत्री कामे दाखवून केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दिनांक २४ जानेवारी पासून हिमायतनगर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर तंटा मुक्त समिती अध्यक्ष राम कंदेवाड, यशवंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रमेश लूमदे, श्रीरंग सूर्यवंशी, गणेश घुंगराळे, राजू देशपांडे, राविकुमार कानिंदे, वैभव कंदेवाड य...
Teaching profession is black…! : शिक्षकी पेशाला काळीमा…! मरखेल जि.प.शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

Teaching profession is black…! : शिक्षकी पेशाला काळीमा…! मरखेल जि.प.शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

क्राईम, नांदेड
देगलूर, नांदेड| देगलूर तालुक्यातील मरखेल जि.प.शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने वाईट नजर ठेवून पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात त्या... आरोपी शिक्षकावर शनिवार दि. 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे पहिले आदर्श असतात मात्र तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असलेले सदानंद विद्यासागर भुताळे या शिक्षकांनी हा आदर्श पायदळी तुडवला आहे. त्याच शाळेत इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपी शिक्षक हा मागील एक महिन्यापासून लैंगिक उद्देशाने पाठलाग करत होता. एव्हढेच नाहीतर त्याने फिर्यादी पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज कर...
Corruption in various development works in Ekamba : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह एकंबा गावात विविध विकासकामात भ्रष्टाचार

Corruption in various development works in Ekamba : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह एकंबा गावात विविध विकासकामात भ्रष्टाचार

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| पाणी फिल्टर मशीन, व १५ व्या वित्त आयोगातून लहान मुलांचे अंगणवाडीतील साहित्य, दलित वस्ती मधील कामे, गावातील अंतर्गत नाल्या व इतर गावातील विकास कामाचे कोणतेही अंदाज पत्रक न करता परस्पर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक खिल्लारे यांनी संबंधित अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे झाल्याचे दर्शवून शासनाचा निधी उचलून घेऊन हडप केल्या प्रकरनाच्या चौकशीसाठी (Corruption in various development works in Ekamba) होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून, जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी व सरपंचावर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्र गावकऱ्यांनी घेतला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा ग्राम पंचायतीत झालेल्या गैर व्यवहाराची चौकशी करून प्रामसेवक खिल्लारे यांचेवर ...
Demand to remove encroachment from Andegaon’s Muslim and Hindu graveyards : आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू स्मशानभूमीतील अतिक्रमित काढून ग्रामपंचायतला ताबा देण्याची मागणी

Demand to remove encroachment from Andegaon’s Muslim and Hindu graveyards : आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू स्मशानभूमीतील अतिक्रमित काढून ग्रामपंचायतला ताबा देण्याची मागणी

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर टालूक्यातील मौजे जुने आंदेगावयेथील मुस्लिम आणि हिंदू समशान भूमीच्या जागेवर अतिक्रमित (Demand to remove encroachment from Andegaon's Muslim and Hindu graveyards) झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अंत्यविधी उरकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता तत्काळ हिमायतनगर तालुक्यातील आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू समशानभूमीतील अतिक्रमित काढून ग्रामपंचायतला ताबा देण्यात यावा. या मागणीसाठी तहसील, पंचायत समिती व भूमिअभिलेख कार्यालयासमोर रामदास देवना पोलसवाड व इत्तर गावकरी मंडळीनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. अतिक्रमण काढण्यात टाळाटाळ केल्यास दरम्यानच्या काळात गावातील मयत होणाऱ्या व्यक्तीचे प्रेत तहसील व भूमिअभिलेख कार्यालयासमोर आणून ठेवण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्त्याने दिला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव ज...
Threatening the journalist cost the smuggler dearly : पत्रकारास धमकी देणे रेती तस्करास पडले महागात

Threatening the journalist cost the smuggler dearly : पत्रकारास धमकी देणे रेती तस्करास पडले महागात

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून एका रेती घाटावर अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीचे पत्रकाराला मिळाल्याने दि, २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास ते नदीपात्रात गेले व व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे रेतीतस्करास कोणीतरी माहीती दिली सदरील पित्त खवळलेल्या तस्काराने पत्रकारास भ्रमणध्वनी वरुण अर्वाच्य शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्या ने त्या पत्रकाराने रीतसर तक्रार दाखल केल्याने त्या तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यात अवैध रेती तस्करीने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तोंड वर काढले आहे अवैध रेतीतुन गबर झालेले तस्करांना दुसरा अक्का तयार झाल्याने ते आता मस्तावले आहेत. दि.२४ रोजी शहरा पासून ८ किमी अंतरावरील रेती घाटावर मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध उत्खनन चालू असल्याचे माहीती मिळाल्याने एका वृत्तवाहिनीचे पत्रकार वा...
Fir sand smugglar ; वाळु तस्कराकडून पत्रकार राजू दराडे यांना जीवे मारण्याची धमकी ; माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Fir sand smugglar ; वाळु तस्कराकडून पत्रकार राजू दराडे यांना जीवे मारण्याची धमकी ; माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। मागील अनेक दिवसापासून श्रीक्षेत्र माहूरगडाला वळसा घालून वाहणार्‍या पैनगंगा नदी पाञातून अवैध मार्गाने वाळु तस्करी होत असल्याची संपूर्ण तालुक्यात कुजबुज चालु असतांना माहूर येथील पञकार राजु दराडे हे पैनगंगा नदी पत्रात वृतसंकलन करण्यासाठी गेले असता एका वाळु तस्करानी जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून माहूर पोलीसांनी वाळु तस्कराविरुध्द गुन्हा नोंद केल्याची माहीती प्राप्त झाली असून या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर/किनवट कडून करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजु दराडे हे वृत्त संकलनासाठी पैनगंगा नदी पाञात  गेले असता एका वाळु चोरट्याने दराडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे. या बाबत पञकार राजु दराडे यांनी ...
Tata company’s truck was seized from the accused : टाटा कंपनीचा ट्रक तोडुन भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी तेलंगणाचे आरोपीकडून जप्त

Tata company’s truck was seized from the accused : टाटा कंपनीचा ट्रक तोडुन भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी तेलंगणाचे आरोपीकडून जप्त

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीसांची कामगीरी विश्वासघात करुन पळवुन घेवुन गेलेला टाटा कंपनीचा ट्रक (Tata company's truck was seized from the accused) क्रमांक MH-24-AB-9595 किमंती 3,50,000/- रुपयाचा तोडुन भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी तेलंगणाचे आरोपी समीर खान शमशेर खान वय 25 वर्ष, व्यवसाय चालक रा. हनुमान मंडी वानकीडी ता. वानकीडी जि. असिफाबाद राज्य तेलंगणा याच्याकडुन जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीण गु.र.नं. 34/2025 कलम 406 भा.द.वि. दाखल गुन्हयांत पोउपनि मटवाड व सोबत टिम यांनी तपासाचे चक्र फिरवुन आरोपी समीरखान शमशे...
error: Content is protected !!