Saturday, May 16

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Padmashali community : नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा देण्याची पद्मशाली समाजाची मागणी

Padmashali community : नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा देण्याची पद्मशाली समाजाची मागणी

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
उमरखेड/हिमायतनगर (प्रतिनिधी) उमरखेड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या तथाकथित शिक्षकाने फुस लावून लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणातील आरोपी शिक्षकास फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी हिमायतनगर तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार व पोलीस ठाण्यामार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री, जिल्हाधिकारी नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह त्याचे भाऊ व इतर सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकील नेमावा, जेणेकरून पीडित कुटुंबास त्वरित न्याय मिळेल, अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे....
Install HSRP : एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा

Install HSRP : एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांनी अधिकृत https://mhhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनाचे काम जसे वाहन हस्तांतरण, वाहनाची पुन: नोंदणी, वाहनाचे वित्तदात्यांची नोंदणी, वाहनाची वित्तदात्याचा बोजा उतरवणे इत्यादी होऊ शकणार नाही. मोटार वाहन कायद्यानुसार सदर नंबर प्लेट मुदतीत बसून वाहनाचे कामकाज करावे व दंड टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनाला HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत...
Ramtirth police action : रामतीर्थ पोलिसांची कारवाई; रेशन गव्हाचा संशयित आयशर जप्त

Ramtirth police action : रामतीर्थ पोलिसांची कारवाई; रेशन गव्हाचा संशयित आयशर जप्त

नांदेड, क्राईम
देगलूर (गंगाधर मठवाले) शहापूर तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर भवानगिरकर, दशरथ जाभळीकर व जमादार बालाजी मुगडे यांनी १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता राज्य महामार्गावर मोठी कारवाई केली. नांदेड–देगलूर मार्गावरील रामतीर्थ शिवारात संशयित आयशर टेम्पो (क्रमांक MH-26-BE-8874) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गव्हाचे पोते आढळून आले. गहू रेशनचा की खासगी? या गव्हाचा रेशनशी संबंध आहे की खासगी व्यवहाराचा, याबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे आयशर टेम्पोसह संपूर्ण माल रामतीर्थ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. पुढील तपासासाठी हा मुद्दा बिलोली तहसील कार्यालय व पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला. पुढील तपासणीवर खरी परिस्थिती स्पष्ट सदर गहू रेशनचा आहे की नाही, हे पुरवठा विभागाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिस...
Tow youth dead : नांदेडमधील दोन तरूणाचा किवळा येथील खदानित बुडून मृत्यु

Tow youth dead : नांदेडमधील दोन तरूणाचा किवळा येथील खदानित बुडून मृत्यु

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे|  लोहा तालुक्यातील किवळा साठवण तलावाजवळील खदानीतील पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. दोघेही खदानीशेजारी रील्स बनवत असल्याचे सांगण्यात आले. दोघांचेही मृतदेह रात्री दहा वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. शेख बाबर शेख जफर (वय १५, रा. बळीरामपूर, नांदेड), मोहम्मद रेहान मोहम्मद युसूफ (वय १६, रा. देगलूर नाका, नांदेड) अशी मयतांची नावे आहेत. दोघेही गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास साठवण तलावा शेजारील सांडव्या जवळ असलेल्या खदानीजवळ रील्स बनवत होते. यावेळी काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना रील्स बनविताना पाहिले होते. मात्र, दोघेही तोल जाऊन खदानीत पडल्याने घटनास्थळी असलेल्या इतर मुलांनी तेथून पळ काढला.   घटनेची माहिती मिळताच इतवाराचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक पां...
Thift arested : स्थानिक गुन्हे शाखेने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपीना केले जेरबंद, ₹32,000 रोख जप्त

Thift arested : स्थानिक गुन्हे शाखेने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपीना केले जेरबंद, ₹32,000 रोख जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील भाग्यनगरातील संगमेश्वर मंदिर व लहुजी नगर, बारड येथील घरफोडी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून ₹32,000 रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीं मध्ये सुरज रामकिशन घेणे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, मालटेकडी रोड, नांदेड, ह.मु. नागाराम झोपडपट्टी, निजामाबाद), अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (वय 23, रा. आंबेडकर नगर, जनता कॉलनी, नांदेड) यांचा समावेश असून, आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी अंदाजे दोन महिन्यांपूर्वी संगमेश्वर मंदिर व बारड येथील घरफोडीतून चोरी केली होती. ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द कर...
Police Action : घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

Police Action : घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

नांदेड, क्राईम
नांदेड| ग्रामीण हद्दीतील पद्मजा सिटी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडने तीन सराईत आरोपींना जेरबंद केले. या आरोपींकडून नगदी 11,37,000 रुपये, सोन्याचे अंदाजे 145 तोळे दागिने (किंमत 16,63,000 रुपये) तसेच ब्रिझा कार असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तर उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने केली. यातील आरोपी शेख शफी उर्फ शफी बिल्डर (रा. उमर कॉलनी, नांदेड), शेख अमेर उर्फ एडी अम्मू (रा. घरकुल, गोवर्धन घाट, नांदेड), नंदकिशोर वामन देवसरकर (रा. देवसरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी कबुली देताना, त्यांनी पद्मजा सिटीतील घरफोडी नियोजनबद्ध पद्धतीने केल्याच...
National Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

National Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

नांदेड, क्राईम
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या प्रांगणात शनिवार 13 सप्टेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 5 हजार 54 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 20 कोटी 24 लाख 16 हजार 512 इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक हे होते. तसेच डॉ. एस.डी. तावशीकर, जिल्हा न्यायाधीश-2, शरद देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, अध्यक्ष अभिवक्ता संघ नांदेड व रणजीत देशमुख जिल्हा सरकारी वकील नांदेड, नांदेड येथील सर्व न्यायाधीश उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी राष्ट्रीय ल...
thift arested : दुचाकीवर बचत गटाची वसुली करून लटकेवेली बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

thift arested : दुचाकीवर बचत गटाची वसुली करून लटकेवेली बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण पोलीसांनी बचत गटाच्या पैश्याची मोटार सायकला लटकविलेली बॅग घेवून पळून जाणाऱ्या दोघांना ताव्यात घेवून एकुण 1,60,510/- रु चा मुद्देमाल केला जप्त केला असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. फिर्यादी सुर्यकांत काशीनाथ बॉडलवाड रा. पाटणपुर ता. अर्धापुर जि नांदेड यांनी दिनांक 26 ऑगस्ट 25 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रार दिली की, दि. 25.08.2025 रोजी गाडेगाव रोडवरील अस्ताना ए हबीब मंजिस्द जवळ एकबालनगर नांदेड येथे रोडच्या कडेला लोन रिकवरीचा जमा झालेली नगदी रक्कम 91,332/- रु ची मोटार सायकला लटकवलेली बँग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. वगैरे फिर्याद वरुन वर नमुद दाखल गुन्ह्यात ओमकांत चिचोलकर पो...
Prof. Ranchandra bharande : मातंग युवकाची धिंड काढून हत्त्या करणाऱ्या सर्व गावगुंडांना अटक करा – प्रा. रामचंद्र भरांडे

Prof. Ranchandra bharande : मातंग युवकाची धिंड काढून हत्त्या करणाऱ्या सर्व गावगुंडांना अटक करा – प्रा. रामचंद्र भरांडे

क्राईम, नांदेड
उमरी/नांदेड| मातंग युवक व त्याच्या प्रेयसीची धिंड काढून क्रूर हत्त्या करणाऱ्या सर्व जातीयवादी गावगुंडांवर गुन्हे दाखल करुन त्या सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केली. लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित संघर्ष नायक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जन आक्रोश मोर्चा उमरीच्या तहसील कार्यालयावर काढण्यात आला. प्र. तहसीलदार शिरफुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना यावेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बोलतांना प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील मौजे बोरजुन्नी येथील मयत दलित मातंग युवक लखन बालाजी भंडारे याचे संजीवनी कमळे या विवाहित मुलीवर प्रेम होते. यासाठी तो संजीवनीच्या सासरी गोळेगाव येथे भेटण्यास गेला असता सासरच्या लोकांनी बांधून ठेवून संजीवनीच्या माहेरच्या लोकांन...
2 kg silver and cash stolen : लोह्यातील दिगंबर जैन मंदिरात २ किलो चांदी व नगदी ३५ हजाराची चोरी

2 kg silver and cash stolen : लोह्यातील दिगंबर जैन मंदिरात २ किलो चांदी व नगदी ३५ हजाराची चोरी

क्राईम, नांदेड
वाढत्या घटनांचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आ चिखलीकर यांची जैन मंदिरास भेट पोलिसांना सूचना लोहा| लोहा शहरातील देऊळ गल्ली भागात असलेल्या वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात दिनांक ११ तारखेला भल्या सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आतील दानपेटी फोडली. त्यातील २ किलो चांदीचे दागिने व ३५ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. सदरील घटनेप्रकरणी जैन मंदिराचे विश्वस्त यांनी लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञाकडून तपास आणि डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी भेट देऊन सूचना दिल्या. तर रात्रीला नांदेडच्या स्थागुशा पथकाने घटनास्थळ पाहणी केली. लोहा शहरात मागील काही दिवसांपासून चोरांच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. पोलिसांची गस्त मुख्य रस्त्याने असते पण पूर्वी कलाल पेठ, भोईगल्ली, मारुती मंदिर...
error: Content is protected !!