HomeनांदेडHockey Comption : आर्मी इलेवन, ऑरेंज सिटी आणी संभाजीनगर संघांचा विजयाचा जयघोष!

Hockey Comption : आर्मी इलेवन, ऑरेंज सिटी आणी संभाजीनगर संघांचा विजयाचा जयघोष!

नांदेड| मंगळवारदि. 23 डिसेम्बर रोजी खेळले गेलेल्या पाच सामन्यात तीन सामन्यांचे निकाल विजयाने लागले. तर बलाढ्य संघांचे दोन सामने बरोबरीत सुटलेत.

मंगळवारी सकाळी सी.बी.डी.टी. दिल्ली विरुद्ध ए.जी.ए.पी. अँड टी.एस. संघा दरम्यान सामना खेळला गेला. वरील सामना दोन विरुद्ध दोन गोल अंतराने बरोबरीत सुटला. अटीतटीचा झाला. दिल्ली तर्फे पहिल्या सत्रात विकास कुमार याने खेळाच्या चौथ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल केला. त्यानंतर विकास चौधरी याने 13 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. ए.जी.ए.पी. अँड टी.एस. संघाने तिसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोल मध्ये केला. मणिकांता याने हा गोल केला. खेळाच्या 47 व्या मिनिटास किरण रेड्डी याने मैदानी गोल करत संघासाठी बरोबरी साधली.

IMG 20251223 WA0035 Hockey Comption : आर्मी इलेवन, ऑरेंज सिटी आणी संभाजीनगर संघांचा विजयाचा जयघोष!

आजच्या दुसऱ्या सामन्यात आर्मी इलेवन जालंधर संघाने आश्विनी क्लब मैसूर संघाचा 8 विरुद्ध 0 असा दारुण पराभव केला. आर्मी जालंधर संघाने सुरुवातीच्या 18 मिनिटात मिळालेल्या तीन पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवत तीन गोल केलेत. परमजीत सिंघ याने दोन आणी मनीष राजबहार याने प्रत्येकी दोन – दोन केलेत. जसकरण केनाथ, अनुराज विश्वकर्मा, प्रदीप भीश्त आणी सूरज बोथलंदा यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.

आज खेळल्या गेलेल्या तीसऱ्या सामन्यात ऑरेंज सिटी नागपुर संघाने 5 विरुद्ध 0 गोल अंतराने हॉकी इटारसी संघाचा पराभव केला. नागपुर संघाने सामन्यावर सुरुवाती पासूनच पकड मिळवली आणी सर्व गोल मैदानी स्वरूपाचे केले. श्रेयस धुप्पे याने सामन्यात दोन गोल केलेत. तर इरशाद मिर्ज़ा, अनास मोहम्मद आणी अफान खान यांनी प्रत्येकी एक गोल केलेत. इटारसी संघ गोल साधण्यात अपयशी ठरला.

आज दुपारी संभाजी नगर आणी युथ खालसा हॉकी क्लब नांदेड यांच्यात सामना रंगला. संभाजीनगर संघाने हा सामना 3 विरुद्ध 1 गोल अंतराने जिंकला. खेळाच्या 17 व्या मिनिटाला मनप्रीतसिंघ चाहल याने सुरेख मैदानी गोल केला. पण तीन मिनीटानंतरच संभाजीनगरच्या भारत याने पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करत बरोबरी साधली. दोन्ही संघानी बहारदार खेळ प्रदर्शित करुन गोल साधण्याचे प्रयत्न केले. खेळाचे सहा मिनिट शिल्ल्क असतांना आशीष शेट्टी याने मैदानी गोल करुन संघाला बढतमिळवून दिली. 56 व्या मिनिटाला ओमकार मगडूम याने मैदानी गोल करत संभाजी नगर संघाचा विजय निश्चित केला.

आज सायंकाळी खेळला गेलेला ए. जी. नागपुर आणी बीएसएफ जालंधर संघातील सामना अनिर्णीत राहिला. अति संघर्षपूर्ण या सामन्यात दोन्ही संघ शेवट पर्यंत गोल करू शकले नाहीत. हा सामना बरोबरीत सुटला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments