नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील महावितरण कार्यालयात असलेल्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या मूर्तीचा मार्ग अडवल्यावरून किनवट – भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ‘उमर-चौक’ परिसरात सायंकाळी ६ वाजता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दोन्ही समाजातील जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात गणपती बाप्पाची मूर्ती नेण्यात येऊन विसर्जन करण्यात आले. सध्या हिमायतनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, हिमायनगर शहरातील महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पाची मोठ्या स्थापना करण्यात आली. नऊ दिवस आनंदाने उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन मंगळवारी अकराव्या दिवशी होणार असल्याने महावितरण कार्यालयातील कर्मचायांनी स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी रविवार दिनांक १५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणपतीची मूर्ती छोताहत्ती या वाहनावर ठेऊन शांततेत विसर्जनासाठी जाण्याची तयारी केली. मुर्तीसह वाहन गेटच्या बाहेर येत असताना काही समाजकंटकांनी उमरचौकातून गणपती बाप्पाला जाऊ देणार नाही असं म्हणत वाद घातला. याची माहिती मिळताच पोलिसांसह दोन्ही समाजातील युवक मोठ्या संख्येने उमर चौक परिसरात जमा झाल्याने तणावाचे वातावरन निर्माण झाले होते.
पोलिसांनी या ठिकाणी येऊन मूर्ती विसर्जनाचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न केला, दोन्ही समाजातील प्रतीष्ठीत व्यक्तींनी युवकाना समजावून सांगून क्षणात कायम ठेवण्याचे आवाहन केले. मात्र काही केल्या तणाव निवळत नसल्याने कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनासही नेण्यात येणारी मूर्ती महावितरण कार्यालयात आवारात परत नेण्यात आली. त्यामुळे सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत म्हणजे दोन तास विसर्जन मिरवणूक निघाली नाही. हिमायतनगर शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने तणाव निवळण्यासाठी आणि गर्दीला पांगवण्यासाठी नांदेड येथून जलद गती पथक व राज्य राखीव दल तैनात बोलाविण्यात आले. तसेच किनवट, हदगाव, भोकर येथून तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाचारण करण्यात आला.
पोलिसांचा ताफा पाहून उमरचौक परिसरात जमलेल्या सुजाण लोकांनी घर गाठणे पसंत केले. आज निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे हिमायतनगर शहरात तणावपूर्ण शांतता असून, आठ वाजताच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महावितरण कार्यालयातील गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी राष्ट्रीय महामार्गाने शहरातील मुख्य श्री परमेश्वर मंदिर कमानीपर्यंत आणण्यात आली. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा अडथळा दूर झाल्याने या ठिकाणी जमलेल्या हजारो हिंदू समाजातील युवकांनी जलोशपूर्ण वातावरण श्री परमेश्वर मंदिरापासून भव्य मिरवणूक काढली. रात्री उशिरा उमरखेड रोडवर असलेल्या श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान गणपती बाप्पाचा मार्ग अडविल्यानंतर शहरातील शांतता टिकवून राहावी यासाठी नांदेड येथून आलेल्या क्युआर टी व एस आर टी पथकाचा बंदोबस्त शहरातील चौक चौकात तैनात करण्यात आला होता. सध्या हिमायतनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.