श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिक श्रेणी १ म्हणून माहूर तालुक्यात कार्यरत असलेले डॉ. संतोष दांडेकर यांची सेवा वर्ग करून महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागात उपयुक्त पदावर अकोला महापालिका येथे नियुक्ती केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. संतोष विठ्ठलराव दांडेगावकर हे मूळ तेलारी ता. किनवट येथील रहिवासी असून येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण किनवट येथे झाले, शिक्षण सुरू असताना त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याने त्यांची पशु वैद्यकीय विभागात श्रेणी १ म्हणून निवड झाल्याने त्यांनी माहूर तालुक्यातील पशु वैद्यकीय विभागात उत्कृष्ट सेवा दिली, त्यामुळे शासनाने पदोन्नतीवर त्यांची अकोला महानगरपालिकेवर उपायुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे.
त्यांची निवड झाल्याचे समजताच माहूरगडचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,नगर सेवक राजेंद्र केशवे,कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, संदीप गजलवाड, देविदास जोंधळे, देविदास सिडाम, गणेश जाधव यांचे सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच अनिल वाघमारे, वसंत कपाटे, विजय आमले, सय्यद रहमत अली, नंदू कोलपवार, निरधारि जाधव, विजय कांबळे, दीपक कांबळे, यांचेसह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी मान्यवर तसेच मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.