उमरखेड, अरविंद ओझलवार। येथील पुसद रोड वरील भारतीय स्टेट बँक येथे एका वृद्ध इसमाने कॅश काँटरवरून साठ हजार रुपये रक्कम पिशवीत टाकून ढाणकी रोडवरील एचडीएफसी बँकेकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी पैशाच्या थैलीला चिरा मारून साठ हजार रुपये लंपास केल्याची घटना दि 19 जून रोजी दुपारी 2.15 वाजता दरम्यान घडली .
फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे .
भिकू राजूसिंग राठोड रा दिंडाळा वय 68 वर्ष या वृद्ध इसमाने एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असता त्यावेळी साठ हजार रुपये कमी पडले असल्याचे मॅनेजर यांनी सांगितले असता बँकेतील तेथील हिंगमिरे नामक कर्मचारीला घेऊन भारतीय स्टेट बँक येथे बँकेतील जमा असलेले साठ हजार रुपये काढण्यासाठी गेले.
कॅश काऊंटरवरून पैसे काढून एका पिशवीमध्ये घेऊन एस डी एफ सी बँके कडे परत येत असताना पैशाच्या थैलीवर लक्ष देऊन बसणाऱ्या चोरट्याने न कळता चिरा मारून साठ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार फिर्यादी भिकू राठोड यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत .
शहरात पाकीटमार व लूटमार करणाऱ्यांच्या टोळीत वाढ
उमरखेड पोलीस स्टेशनला प्रभार संभाळण्याच्या दिवसांपासून बँक समोर व एसटी बस स्थानक परिसरात पाकीटमार, लूटमार करणाऱ्यांची संख्या वाढली असून पोलीस प्रशासन या परिसरातील चोरट्यांचे मुस्क्या आवळतील का ? असे सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे .