नवीन नांदेड l असदवन येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण कथा ,श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन 12ते 19 एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले असुन श्रीमद भागवत कथा प्रवक्ता हभप श्री प्रभाकर महाराज पुयड मिश्री पिंपळगाव दुपारी 1 ते 4 भागवत कथा आयोजित करण्यात आली असून 19 एप्रिल रोजी काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे.


वर्ष चौथे असुन दैनंदिन पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा,हरिपाठ,हरि किर्तन व जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये रामायण चाय हभप बाबु किशन महाराज कुदळेकर,गुरू कृपा किंमत हभप शंकर महाराज सोनमांजरीकर,हभप कोंडीबा महाराज पासदगावकर, जोग महाराज, हभप संतोष महाराज, गुरुवर्य रूद्रगिर महाराज किवळेकर,हभप भगवान गुरूजी ढोणे,हभप शिवाजी महाराज करखेलीकर, यांच्ये हरि किर्तन होणार आहे.


19 एप्रिल रोजी हभप प्रभाकर महाराज पुयड यांच्या सकाळी काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे,या नंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित धार्मिक कार्यक्रमाला भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गावकरी मंडळी असदवन यांनी केले आहे.
