किनवट, परमेश्वर पेशवे| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नाईक घराण्याच्या स्नुषा डॉ. सुप्रिया कपिल नाईक यांनी ही महिला आघाडीत सक्रिय सहभाग नोंदवला तर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ. अनुसया सतीश जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या.
आगामी काळात देशाच्या व राज्याच्या राजकारणात 50 टक्के जागा महिलांकरिता राखीव राहणार आहेत. या अनुषंगाने संसदरत्व खा. सुप्रिया सुळे, महिला प्रांत अध्यक्ष रोहिणी खडसे व माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तर पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील महिलांनाही मुख्य प्रवाहात समाविष्ट करावे कारण भविष्यात महिलांना अनेक संधी राजकारणात मिळणार आहे. तर महिला ह्या राजकारणात असल्या तर खूप चांगले काम करू शकतात हे खा. सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे महिलांनी भविष्यातील राजकारणासाठी तयार राहावे असे यावेळी मार्गदर्शन करताना सौ. सुप्रिया कपिल नाईक यांनी सांगितले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्यासह शहर अध्यक्ष उषाताई वाढवे, सौ.मंजुळाबाई प्रकाश राठोड, सौ.संगीता प्रवीण म्याकलवार, सौ.शिवकांता गजानन मुंढे, संचालक सौ.विद्याताई संतोष दासरवार, सरपंच सौ. ज्योत्स्ना कैलास जाधव, सौ.जोत्सना राहुल नाईक, सौ.माधुरी बालाजी बामणे, सौ. उज्वला तुषार मुंडावरे, सौ. प्रमिला ज्योतिबा गोनारकर, सौ.माधुरी राहुल सोनकांबळे, जाईदबाई शेख, मुन्नीबी शेख, लावण्या उचलवार, सर्फना शेख, शशिकला नरवाडे, रजिया शेख, सुनीता राठोड, सत्वशील बाई यांची उपस्थिती होती.