नवीन नांदेड। बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या मोबदल्या वाढ करून देण्याची मागणी नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील ग्रास्थांनी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यी भेट घेऊन केली आहे.
नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथुन जालना – नांदेड समृध्दी महामार्गाच्या मार्ग जात असून मोबदल्यात आम्ही वारंवार पाठपुरावा करून ही अतिअल्प मोबदला देत आहेत. सदरील जमिन ही वास्तविक बाजार भावाचा विचार करता अतिशय महाग असून मिळणारा मोबदला हा तुटपुंजा असून ,पाचपटीचा सहमति देवून ही मोबदला मात्र काही बाधित शेतकऱ्यांना चार पटच मिळाला आहे. तर 12% व्याजाचा विषय कोरोना काळात न वाढलेले रेडि रेकनरने दर अशा बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे बाभुळगाव येथे आले असता बाधीत असलेल्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी सरपंच पुंडलिक मस्के, माजी सरपंच दता मस्के, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख ऊबाठा गटाचे शिवसेना प्रमुख अशोक मोरे, विश्वनाथ मस्के, रामराव मस्के, रंगनाथ मस्के, मोहन मस्के, परभतराव मस्के, अशोक मस्के, सुधाकर मस्के, गजानन मोरे, रामदास मैड, अवधुत मोरे, नरबा मोरे संतोष मस्के, सुर्यभान मोरे, माधवराव मस्के, चक्रधर मस्के यांच्या सह संबधित शेतकरी यांनी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटुन चर्चा केली.