Homeक्राईमदत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा...

दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL

नांदेड। माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे तत्कालीन सरपंच विमलबाई बळीराम पवार आणि ग्रामसेवक एल.एल.पपुलवाड यांनी संगणमताने कसल्याही प्रकारचे विकास कामे न करता ग्रामपंचायत दत्तमांजरी येथील १४ व्या वित्त आयोगातील निधी तेरा वेळा उचलून रक्कम हडप केली आहे.

त्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी असा लेखी अहवाल पंचायत समिती माहूरचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दि.८ऑगस्ट २०२२ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केला आहे. चौकशी अहवाल देवून दोन वर्ष झाली.

परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने दत्तमांजरी येथील माजी उप सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनोज किर्तने कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.१५ जुलै ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांनी वरिष्ठाना पाठविलेल्या अहवालात पंधरा लाख ९३ हजार विस रुपये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी परस्पर उचलून विकास कामे न करता निधी हडफ केल्याचे स्पष्ट शब्दात चौकशी अहवालात नमूद केले आहे. गावाच्या विकासाचा सोळा लाख रुपये शासनाचा विकास निधी खाऊनही प्रशासन दोन वर्षापासून भ्रष्टाचाऱ्यांना का वाचवत आहे.तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती वरिष्ठाकडे केली आहे.

जि.प.च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)श्रीमती जाधव यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून लवकर कारवाई झाली नाही तर पुढील आठवड्यात जिल्हा परिषद नांदेड समोर उपोषणास बसावे लागेल अशी भूमिका मनोज कीर्तने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments