नांदेडमहाराष्ट्र

Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

नांदेड| मागास तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीने आकांक्षित कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

देशातल्या ३९९ जिल्ह्यातील ५०० आकांक्षित तालुक्याना या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्ह्यातील २७ तालुक्यांचा यात समावेश आहे. तर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा यात समावेश आहे.

नीती आयोगामार्फत २ वेळा संपूर्ण देशभरातील ५०० आकांक्षित तालुक्याची रँकिंग झाली यात पहिल्या रँकिंग मध्ये किनवट तालुका देशातून २६९ व्या क्रमांकावर होता. तर दुसऱ्या रँकिंग मध्ये ८८ व्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या रँकिंग चा डेटा प्रकाशित होणे अद्याप बाकी आहे. सद्यस्थितीत किनवट तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज मितीला किनवट तालुका 88 व्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी संबंधित सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा व सामाजिक विकास या पाच क्षेत्रातील ३९ निर्देशकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभाव अंमलबजावणी सुरु आहे. आरोग्य, पोषण, कृषि व सामाजिक विकास यातील ६ निर्देशक १००% संकल्प करण्यासाठी जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे सदर अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते किनवट येथे ३ जुलै २०२४ रोजी करण्यात आले आहे.

आकांक्षित तालुका कार्यक्रमात प्रामुख्याने जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आलेल्या या अभियानात संकल्प सप्ताह, चिंतन शिबिरसह आतापर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आणि पोषणाच्या अनुषंगाने किशोरी आरोग्य सर्वेक्षण, मासीक पाळी व्यवस्थापन, किशोरी हितगुज मेळावा, बालविवाह प्रतिबंधक जनजागृती, पोषण पंधरवडा, टीबीमुक्त गाव, अति जोखमिच्या मातांच्या घरी सातत्याने गृहभेटी, मलेरिया प्रतिबंध आणि उपचाराबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी जनजागृती, एचबी व अनेमिया तपासणी, सॅम मॅम बालक शोध मोहीम, उच्च रक्तदाब व मधुमेह संदर्भात NCD स्क्रिनिंग, गाव तेथे परसबाग, आरोग्य शिबिर आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिक्षणाच्या अनुषंगाने मुलींची गळती कमी करण्यासाठी शाळेत स्वछतागृहाची उपलब्धता, मानव विकास योजनेतून मोफत सायकल वाटप, शैक्षणिक योजने संदर्भात शाळास्तरावर जनजागृती, जल जीवन मिशन अंतर्गत शाळांना नळ जोडणी दिली जात आहे. कृषि व त्या संबंधित सेवा अंतर्गत माती तपासणी, मृदा आरोग्य पत्रिका संदर्भात जनजागृती, पशु लसीकरण, जल पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मूलभूत पायाभूत सुविधा अंतर्गत स्वछ व सुंदर गावं, हर घर जल, स्वयंसहायता गटांची निर्मिती, दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावनी, स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल आदी वर भर दिला जात आहे.

याच आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या माध्यमातून एएमएन, आशा, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण तसेच शिक्षकांना यु-डायस प्रशिक्षण, जलसुरक्षकाना जलसंवर्धन बाबत प्रशिक्षण, वैद्यकीय अधिकारीना NQAS बाबत प्रशिक्षण, अंगणवाडी सेविका यांना पोषण ट्रॅकरचे प्रशिक्षण आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आकांक्षित तालुका कार्यक्रमाचे जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे काम पाहत आहेत. तालुकास्तरावरील सदर कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव हे नेतृत्व करत आहेत. या कार्यक्रमास सहाय्यक म्हणून आकांक्षित तालुका फेलो पांडुरंग मामीडवार, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, विस्तार अधिकारी पंचायत हे प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button