Wednesday, May 13

District Supply Officer Rupali Chaugule | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेसाठी “राशन कार्ड “वेगळे करण्याची गरज नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले -NNL

नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना वयाचा पुरावा, उत्पनाचे प्रमाण पत्र , व इतर आवश्यक कागदपत्रे असेल तर याच योजनेसाठी एकत्रित कुटुंबातील “राशन कार्ड “वेगळे करण्याची, विभक्त करण्याची गरज नाही. त्यामुळे राशन कार्ड वेगळे करण्यासाठी तहसील कार्यालयात होणारी गर्दी टाळता येईल.तेव्हा ” माझी लाडकी बहीण” योजनेत राशन कार्डा ऐवजी वरील कागदपत्रे जोडून वेळेवर अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना लाभ घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात राशन कार्ड वेगळे (विभक्त) करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.पण राज्य सरकारने जी उत्पन्नाची किमान मर्यादा दिली आहे. त्याच्या आत उत्पन्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी एक लाखापेक्षा जास्त व अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडावा, रहिवाशी प्रमाणपत्र म्हणून राशन कार्ड, वयाचा दाखल (ज्यात टीसी, प्रवेश निर्गम, जन्म नोंद प्रमाणपत्र इत्यादी ) जोडून” या ” योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

पण राशन कार्ड वेगळे (विभक्त) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात गर्दी केली जात आहे.पण “लाडकी बहीण योजनेत राशन कार्ड विभक्त करण्याची तूर्तास गरज नाही त्यासाठी उपरोक्त कागदपत्रे जोडावीत असे जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी सांगितले. कुटुंबात दोन पेक्षा महिला अधिक आहे त्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून राशन कार्डातून नाव काढणे व ते वेगळे राशन कार्ड करणे यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली जात आहे. पण एखाद्या कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिला असतील तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तसेच राशन कार्डात नवीन नाव टाकणे, नाव कमी करणे ही कामे प्राधान्यक्रमाने तात्काळ करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तहसील पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले या स्वतः या बाबत आढावा घेत आहेत अडीअडचणी सोडविता आहेत जेणेकरून कोणीही पात्र लाभार्थी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने पासून वंचित राहणार नाही याचीदक्षता घेत आहेत.

राशन कार्ड वरील नाव कमी -नव्याने समाविष्ट करणे ही प्रकिया जेमतेम आठ दिवसात पूर्ण होते. या योजनेची माहिती व त्यासाठी लागणारी लागणारी कागदपत्रे याची माहिती दर्शविणारा फलक तहसील कार्यालच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. तेव्हा ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी राशन कार्ड विभक्त करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करून नये. एकाच कुटुंबातील दोन हुन अधिक महिला असतील तरी अर्ज करता येईल तसेच उत्पन्नाचा दाखला,ववयाचा पुरावा, व राशन कार्ड तसेच इतर आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत सादर करावीत असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!