Lokmanya Tilak’s birth anniversary | हु ज पा महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती – NNL

हिमायतनगर। येथील हुतात्मा जयंवतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.


या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. डी. के. कदम हे होते. ते आपले विचार मांडताना म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान महत्त्वाचे होते. की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक देशभक्त होते. त्यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हणतात असा मोलाचा संदेश लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने बोलताना दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. के. कदम सर होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. डी. सी. देशमुख सर व आभार प्रदर्शन डॉ. एल. बी. डोंगरे सर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





