Friday, May 15

शिवाजी महाविद्यालय सिडको दोन विधार्थी आय. आय. टी. साठी निवड – NNL

नवीन नांदेड| नांदेड येथील अमेय शशिकांत बल्लाळ व कु.ऋतुजा गजानन चक्रावार या दोन विद्यार्थ्यांचा अनुक्रमे आय. आय. टी जोधपुर व आय. आय. टी मंडी येथे निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.

शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड येथील अमेय शशिकांत बल्लाळ व कु.ऋतुजा गजानन चक्रावार या दोन विद्यार्थ्यांचा अनुक्रमे आय. आय. टी जोधपुर व आय. आय. टी मंडी येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील, सौ.देगावकर ,वरिष्ठ लिपिक वसंत वाघमारे, सुनील देवकर, गजानन सूर्यवाड आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!