Friday, May 15

Shashikant Mahavarkar will take charge in Pimpri Chinchwad in Shahaji Umap Nanded..! | शहाजी उमाप नांदेडमध्ये शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारणार पदभार..! -NNL

नांदेड। शासनाने नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षकपदी शहाजी उमाप यांची नियुक्ती केली होती. या पदावर सध्या कार्यरत विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची सीआयडी पुणे या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र शशिकांत महावरकर हे बदली आदेशाविरूद्ध न्यायालयात (कॅट) मध्ये गेले होते. यावर नुकतीच सुनावणी झालीअसून, शासनाच्या वतीने शशिकांत महावरकर यांना पिंपरी चिंचवड येथे नियुक्ती देण्यात आल्यामुळे शहाजी उमाप यांची नांदेड उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहाजी उमाप नांदेडाला तर शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडला लवकरच रुजू होणार आहेत.

IMG 20240719 WA0044 1 Shashikant Mahavarkar will take charge in Pimpri Chinchwad in Shahaji Umap Nanded..! | शहाजी उमाप नांदेडमध्ये शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारणार पदभार..! -NNL

गेल्या आठवड्यापासून नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षकपदाच्या बदलीचे नाट्य चांगलेच गाजले आहे. शहाजी उमाप यांच्या नियुक्तीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या अनेकांनी उमाप यांचं अभिनंदन करत स्वागताची तयारी सुरु केली होती. मात्र शशिकांत महावरकर हे बदली आदेशाविरूद्ध न्यायालयात (कॅट) मध्ये गेले होते. त्यानंतर न्यायालयाने १९ जुलै पर्यंत स्थगिती दिली होती. दरम्यान यासाठी दोघांनीही तेवढीच शक्ती लावली. महावरकर यांनी संघर्ष केल्यामुळे महावरकर यांना पिंपरी चिंचवड येथे सहआयुक्तपद मिळाले. अन्यथा त्यांना पोलीस महानिरीक्षक सीआयडी म्हणून काम करावे लागले असते.

पिंपरी चिंचवड सहआयुक्तपद सहसा कोणाला मिळत नाही. त्यासाठी मोठी स्पर्धा असते. परंतु या स्पर्धेत शशिकांत महावरकर यांनी बाजी मारली आहे. महावरकर यांनी नागपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी पदनियुक्ती करावी असे सांगितले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर चार पर्याय ठेवण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड सहआयुक्तपद त्यांनी निवडले आहे. न्यायालयाने या प्रकरणी २९ जुलै रोजी पुन्हा एकदा सुनावणी ठेवली असून, या सुनावणीनंतर ३० जुलै रोजी शहाजी उमाप पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पिंपरी चिंचवड येथे सहआयुक्तपद महावरकर यांनी निवडल्यामुळे आता त्यांच्या संघर्षांवर पडदा पडला आहे. लवकरच ते पिंपरी चिंचवड येथे रुजू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!