विशालगड, गाजापुर मस्जीद पाडण्याचा प्रयत्न व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्लेखोरांवर कार्यवाही करा – NNL

हिमायतनगर,असद मौलाना| कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथील मस्जीद पाडण्याचा प्रयत्न केला व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्ले करणाऱ्या समाजकंटका विरुद्ध कठोर कारवाई करावी. अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने हिमायतनगर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान केले. अश्या प्रकारे अचानक हल्ले करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील मुस्लिम समाजाचे वतीने पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दि. १८\७\२०२४ रोजी लेखी निवेदन देण्यात आले.

तसेच तालुका दंडाधिकारी हिमायतनगर व महाराष्ट्र शासनाला पोलीस प्रशासनामार्फत निवेदनाच्या प्रती पाठवून तुमच्या भावना कळविण्यात येईल अशी गवाही पोलीस निरीक्षक भगत यांनी दिली. सदर निवेदनावर हिमायतनगरचे ज्येष्ठ काझी मोविजोद्दीन, अजीज मौलाना, मुजीब खान पठाण, अन्वर खान पठाण, अश्रफ खान पठाण, अब्दुल मन्नान, जाहीद मौलाना, खलील मौलाना, असद मौलाना, सय्यद रफिक भाई, सय्यद अजीम, शेख.अस्जद आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी बीट जमादार कोमल कांगणे व तसेच श्यामसुंदर नागरगोजे, पोटे आदी कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button