youth died after touching an electric wire । शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन 22 वर्षे तरुणाचा मृत्यू -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। शेतातील पोल वाकून लोंबकाळलेल्या विद्यूत वाहक तारांचा स्पर्श र्होऊन पार्डी खुर्द येथिल संभाजी कांदे (वय वर्ष ६६) आजोबा जखमी तर बोधडी खुर्द येथिल नातू पवन रामेश्वर मुंडे (वय वर्ष २२) या तरुणाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटना १२ जुलै रोजी पेन्दा गावच्या शिवारात घडली. या संतापजनक आणि र्हदयाचे ठोके वाढवणार्या घटनेला जबाबदार असणार्या लाईनमनसह संबंधितांवर कर्तव्यकसूरतेसह चक्क मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी संतप्त नागरीकांची मागणी आहे.


या घटनेपेक्षाही अनेकांचा जीव घेणारी घटना प्रधानसांगवी गावातील मुख्य चौकात घडण्याची भिती गावकर्यांनी व्यक्त केली. लोकवर्दळ असलेल्या चौकातील एक पोल बुडातून तुटलेला तर दुसरा पूर्ण वाकलेला असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. असे असतांना देखिल महावितरण कम्पनी प्रशासन लापरवाह करीत असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. बोधडी खुर्द येथिल पवन मुंडे हा त्यांचे पार्डी खुर्द येथिल आजोबा (आईचे वडील) संभाजी कांदे यांच्या पेन्दा/नागनाथदेव येथिल शेतात डवरे धरण्यासाठी गेले होते. शेतातील पोल वाकून विद्यूत वाहक ताराही मानसाच्या डोक्याला लागतील इतक्या लोंबकाळलेल्या आहेत.

त्या तारांना आजोबा कांदेंच्पा मानेला स्पर्ष झाल्याने ते दूरवर फेकल्या जाऊन बचावले पण दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे सूत्र सांगतात. तर नातू पवन मुंडे हा विद्यूत तारांना चिटकल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची भयावह घटना घडल्याचे वृत्त आहे. लोंबकाळलेल्या तारांविषयी महावितरणच्या बोधडी बु.च्या कार्यालयाला वारंवार कळवले मात्र त्यांनी दखल घेतलेली नाही. अखेर पवन मुंडेला जीव गमवावा लागला. या प्रकरणी संबधित दोषी विरुद्भ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी संतप्त लोकांची मागणी आहे.



महावितरण प्रशासन यावर काय पाऊल उचलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसर्या बाजूने गोकुंदा ग्रामिण विज वितरण कम्पनी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रधासांगवीतील मुख्य चौकात एक पोल बुडातूनच तुटलेला आहे. केवळ विद्यूत वाहक तारांच्या मदतीने उभा आहे. अवघ्या विस फुटाच्या अंतरावरील दुसरा पोल नव्वदअंशाचा वाकलेला आहे. कधी कोसळेल याचा नेम नाही. लोकवर्दळीचा हा गावातील मुख्य चौक आहे. आॅटोंचा थांबा, किराणा दुकानं याच चौकात आहेत. अशा ठिकाणी विद्यूत असतांना वाहकतारांसह एक पोल कोसळलातर तो दुसर्या पोलला घेऊन पडेल.

त्यातून किती जीवितहानी आणि विविध प्रकारची हानी होईल ? याबद्धल गावकर्यांनी चिंता व्यक्त केली. दोन महिन्यापासून नविन सिमेंटपोल आणून ठेवलेत मात्र यंत्रणा पोल बदलायला तयार नाहीत. उलटपक्षी हेच पोल लाईनमन दुसरीकडे लांबवायच्या तयारीत होता. परंतू माजी उपसरपंच ब्रम्हाजी केंद्रेंसह कांही नागरीकांच्या सजगतेमुळे पोल फेकून लाईनमनला पळ काढावा लागल्याचे कांहींनी सांगितले.



