national highway | हिमायतनगर शहराजवळ राष्ट्रीय महामार्गाचा साईड पट्टीचा डांबरी रस्ता महिनाभरातच खचला – NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरानजीक पेट्रोल पंपाच्या पुलापाशी महिन्याभरापूर्वी करण्यात आलेल्या डांबरी साईड रस्ता खचला आहे. यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ संबंधित ठेकेदाराने केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्याला अभय देणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासीय नागरिक व वाहनधारकांतून केली जात आहे.


हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे, मागील पाच वर्षांपूर्वी हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली. या रस्त्याकामचे उद्घाटन रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी यांनी रस्त्याचे काम दर्जेदार करावे बोगस कामाचा प्रकार आढळून आल्यास ठेकेदारावर कडक कारवाई केली जाईल असे भर सभेत माहूर येथे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर किनवट ते हिमायतनगर आणि हिमायतनगर ते भोकर या रस्त्याचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांतर्फे सुरू करण्यात आले. मात्र संबंधित ठेकेदाराने या कामात अतिशय निकृष्ट पणा अवलंबवीला त्यामुळे अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते खचून मोठं मोठया भेगा पडल्या आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी काम अर्धवट ठेवण्यात आले असून, हिमायतनगर शहराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे काम ठेकेदाराने पेंडिंग ठेवले आहे.


अद्याप पुलाचे काम पेंडिंग असल्याने रेल्वे येताच रेल्वे गेट जवळ शेकडो वाहनांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. येथील रेल्वे उलन पुराचे काम जर झाले असते तर वाहनांना ताटकळत बसण्याची वेळ आली नसती एकूणच पूल झाल्या नसल्यामुळे बऱ्याच वेळा रुग्णवाहिकेलाही अडकवून थांबवावे लागल्याने अनेकांना आपला जीव गमावा लागला असल्याचे सर्वश्रुत आहे ही बाब लक्षात घेता रेल्वे गेटवरील उडान पुलाचे काम होणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर शहरात जाणाऱ्या रस्त्याच्या साईड पट्ट्याचे काम ठेकेदाराने अर्धवट्यात ठेवले होते याबाबत नागरिकांची ओरड पाहून ठेकेदाराने महिन्याभरापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या बाजूने दहा फुटाच्या डांबरी रस्त्याचे काम केले.


मात्र यातही थातूर मातुरपणा केल्यामुळे महिन्याभरापूर्वी केलेल्या साईडचा डांबरी रस्ता पुलानजीक खचला आहे. अंदाजे एक फूटडांबरी रस्ता दबला असल्यामुळे हिमायतनगरकडे रात्रीच्या अंधारात भरद्याव वेगात येणारे वाहनाचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही धोकादायक बाब लक्षात घेता तात्काळ तुला नजीक घातलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूला वाहनधारकांसाठी सूचना फलक लावण्यात येऊन खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करून संभाव्य अपघात टाळाव. अशी मागणी वाहनधारक व शहरवासीय नागरिकांतून केली जात आहे.




