हदगाव, शेख चांदपाशा| एसटी बसेस व अन्य सवलती मिळाव्यात म्हणून काही महीलांनी आपले वय कमी असतांना ही मतदार ओळख पञ आधारकार्डवर वाढवून घेतले. याचा फायदा बस प्रवासाकरिता व शासनाच्या अन्य योजेनेला झाला तरी माञ हदगाव तालुक्यातील बहुसंख्य महीला माञ मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेपासुन वचिंत राहणार असल्याचे चिञ दिसुन येत आहे.

वय वाढवून घेणा-या महीलाना आता माञ पश्चात्ताप होत असल्याच दिसून येत आहे. तर काही महीला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत माञ फार्म भरतांना दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने 21ते 65वर्ष वयोगटातील ‘लाडकी बहीण ‘या योजेनेतून बस प्रवासा करिता वाढवून घेणाऱ्या महीला या योजनेपासुन अपाञ ठरणार आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन असुन, शेवटचे अधिवेशन असल्याने लोकप्रियता मिळविण्यासाठी अश्या घोषणा होत आहेत असे विरोधी पक्षाच्या लोकांकडून बोलले जात आहे.

विशेष म्हणजे घोषणा होताच दुसऱ्या दिवशी नगरपालिका तलाठी व तहसिल कार्यालयामध्ये महीलांची प्रचंड प्रमाण झुंबड उडाली होती. ही अलोट गर्दी पाहता शासनाने काही अटी कमी केले. काही वर्षा पुर्वी 65वर्ष वयाच्या व्यक्तिना बस मध्ये अर्धतिकीट ही योजना जाहीर केली होती. त्यावेळी बहुसंख्य महीलानी अट्टाहास करत कागदपञे काढत 45. 50.55.वय आसणा-यानी देखील 65वर्षाच्या पुढ असल्याच कागदपत्रे काढुन हाफ तिकीटचा फायदा घेतलेल आहे.


यात किती महीलांनी हाफ तिकीटावर फायदा घेतला याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी परंतु अश्या प्रकारे वय वाढवून घेणाऱ्या हदगाव तालुक्यातील बहुसंख्य महीला मतदान ओळखपञ, आधारकार्डनूसार 65वर्षाच्या पुढे गेलेले आहे. मुख्यमंञ्याची लाडकी बहीण ही योजना 21ते65 वर्ष महीला करिताच आहे. यामुळे अनेक महीलांना दर महीण्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या लाभाला मुकावे लागणार आहे.

*आज्जी ‘लाडकी नाही का..?
आयुष्यभर कष्ट करुन आपला परिवार उभे करणा-या ज्या वयोवृध्द महीला आयुष्यच्या शेवटच्या उबरठ्यावरआहेत .बहुसंख्य अश्या वयोगटातील महीला कोणावर तरी आवलंबून असलेल्या वृध्दाना या योजनेत समाविष्ट करण्याची फार गरज आहे. कारण हातपाय थकल्याने परिवाराचे मुले मूली या वृद्धा कडे लक्षदेत नाहीत. यामुळे वृद्धाश्रमात दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या हे काय..? दर्शविते. केवळ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा सरकाचा निर्णय कितपत फलदायी ठरणार हे येणारा काळच ठरविणार अशी कुजबूज नागरिकांत ऐकवायास मिळत आहे.

