मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL
हदगाव, शेख चांदपाशा| एसटी बसेस व अन्य सवलती मिळाव्यात म्हणून काही महीलांनी आपले वय कमी असतांना ही मतदार ओळख पञ आधारकार्डवर वाढवून घेतले. याचा फायदा बस प्रवासाकरिता व शासनाच्या अन्य योजेनेला झाला तरी माञ हदगाव तालुक्यातील बहुसंख्य महीला माञ मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेपासुन वचिंत राहणार असल्याचे चिञ दिसुन येत आहे.
वय वाढवून घेणा-या महीलाना आता माञ पश्चात्ताप होत असल्याच दिसून येत आहे. तर काही महीला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत माञ फार्म भरतांना दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने 21ते 65वर्ष वयोगटातील 'लाडकी बहीण 'या योजेनेतून बस प्रवासा करिता वाढवून घेणाऱ्या महीला या योजनेपासुन अपाञ ठरणार आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन असुन, शेवटचे अधिवेशन असल्याने लोकप्रियता मिळविण्यासाठी अश्या घोषणा होत आहेत असे विरोधी पक्षाच्या लोकांकडून ब...
