नांदेड। “संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता “आम्ही जरांगे” च्या रुपाने मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला आलाय. तो मराठ्यांसह सर्व समाजाने पाहिला पाहिजे असे प्रतिपादन माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर यांनी केले.
आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा ” या चित्रपटाच्या प्रिमियर शो माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर यांनी भारत इ-स्केअर नांदेड येथे आयोजित केला. त्या दरम्यान पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला चीत्रपटाचे निर्माते दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले, डॉ.दत्ता यशवंतराव मोरे, जरांगे पाटलाची भूमिका असलेले कलावंत प्रथ्वीराज थोरात,प्रियंका उबाळे,श्याम पाटील,दशरत कपाटे,नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,श्याम कोकाटे,वैभव भोसले,शुभम देशमुख यांची उपस्थीती होती. या प्रीमिअर शो मधे विविध मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या.
गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं “मनोज जरांगे पाटील”. यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा ५ जुलै २०२४ पासून आता सर्वत्र प्रदर्शित झालाय. अंगावर शहारे आणणारा सिनेमाच्या ट्रेलर नंतर चित्रपटाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर पहायला मिळतोय.
सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तर प्रसाद ओक अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारताय. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.