Homeनांदेडभाजपाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अभिषेक सौदे यांचा सत्कार

भाजपाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अभिषेक सौदे यांचा सत्कार

सातत्य, समर्पण, निष्ठा आणि संयमाच्या जोरावर प्रदेश पातळीवर मोठी संधी; अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते अभिनंदन

नांदेड | भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी डॉ. अभिषेक सौदे यांची निवड झाल्याबद्दल नांदेड येथे त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते डॉ. अभिषेक सौदे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन करण्यात आले.

सातत्य, समर्पण, पक्षनिष्ठा आणि संयम या गुणांच्या जोरावर डॉ. अभिषेक सौदे यांनी पक्ष संघटनेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पक्षाने वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडत संघटनात्मक कार्यात सातत्य ठेवले. त्याच कार्याची दखल घेत त्यांना आता महाराष्ट्र प्रदेश पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, सरचिटणीस विजय येवणकर यांच्यासह संतोष मुळे, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, सुषमा थोरात, ज्योती कल्याणकर, दिलीप ठाकूर, निलेश कुंटूरकर, आशिष नेरलकर, सुमित मुथा, भालचंद्र पवळे, तातेराव जाधव, किशन कल्याणकर, सुरेश लोट, धिरज स्वामी, सचिन रावका, बंडु पावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. अभिषेक सौदे यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा उपयोग नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या नियुक्तीमुळे नांदेड शहर व जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून प्रदेश पातळीवरील जबाबदारीपर्यंतचा डॉ. अभिषेक सौदे यांचा प्रवास हा सातत्य, निष्ठा, समर्पण आणि संयमाचे उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments