Homeकरियरकॉ. अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानचा पत्रकारिता पुरस्कार रत्नाकर महाबळे यांना जाहीर

कॉ. अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानचा पत्रकारिता पुरस्कार रत्नाकर महाबळे यांना जाहीर

२५ वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेची दखल; १७ सप्टेंबर रोजी कुसुम सभागृहात पुरस्कार वितरण

नांदेड/लोहा| प्रख्यात कामगार नेते व स्वातंत्र्यसैनिक दिवंगत कॉ. अनंतराव नागापूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदाचा पत्रकारिता पुरस्कार लोहा येथील ज्येष्ठ पत्रकार रत्नाकर महाबळे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सायं. दैनिक नांदेड वार्ताचे संपादक कॉ. प्रदीप नागापूरकर आणि उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

रत्नाकर महाबळे हे गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, श्रमिक एकजूट या दैनिकासाठी ते वार्तांकन करतात. निःस्पृह आणि निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात ओळख आहे. सामाजिक प्रश्न, कामगार व वंचित घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला आहे.

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यातही महाबळे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. संघाच्या तालुका सरचिटणीस, कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ज्येष्ठ संपादक कृष्णा शेवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्रकारितेची वाटचाल सुरू झाली.

पत्रकारितेसोबतच सामाजिक व धम्म चळवळीतही महाबळे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा नांदेडचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अकरा वर्षांपासून वर्षावासाच्या काळात ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे चार महिने जाहीर प्रकट वाचन व अर्थस्पष्टीकरण करण्याचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत.

कॉ. अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नाकर महाबळे यांचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार रोहिदासराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ संपादक कृष्णा शेवडीकर, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, अध्यक्ष संतोष पांडागळे, संपादक गोवर्धन बियाणी, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल दत्ता वाले, हरिभाऊ चव्हाण, बालाजी खिल्लारे, हरिहर धुतमल, गोविंद कदम, यानभूरे यांच्यासह मित्रपरिवार व पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

१७ सप्टेंबर रोजी कुसुम सभागृहात पुरस्कार वितरण – कॉ. अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आलेले पुरस्कार १७ सप्टेंबर रोजी कुसुम सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments