अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

NNL Team
By NNL Team

नांदेड| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असून, नांदेड जिल्ह्यातील ३९ हजार २५५ शेतकरी पात्र ठरले आहेत.

Contents
बँकनिहाय याद्याही उपलब्ध – आता दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून, जिल्हानिहाय यादी परिशिष्ट-अ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट-ब मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित याद्या बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.कर्ज खात्याची स्थिती तपासण्याचे आवाहन – दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची ३१ मार्च २०२६ रोजीची स्थिती विचारात घेण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाहीत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. मृत, वयोवृद्ध तसेच बोटांच्या ठशाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ देण्याच्या दृष्टीने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित करण्यात आली आहे.आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम – दुसऱ्या यादीत समाविष्ट शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची ३१ मार्च २०२६ रोजीची स्थिती तपासावी. त्यानंतर नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे. 

या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीक कर्ज तसेच पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर बँकांकडून कर्ज खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२ लाख ५८ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण १० हजार ११५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

बँकनिहाय याद्याही उपलब्ध – आता दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून, जिल्हानिहाय यादी परिशिष्ट-अ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट-ब मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित याद्या बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

कर्ज खात्याची स्थिती तपासण्याचे आवाहन – दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची ३१ मार्च २०२६ रोजीची स्थिती विचारात घेण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाहीत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. मृत, वयोवृद्ध तसेच बोटांच्या ठशाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ देण्याच्या दृष्टीने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित करण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम – दुसऱ्या यादीत समाविष्ट शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची ३१ मार्च २०२६ रोजीची स्थिती तपासावी. त्यानंतर नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे. 

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!