Homeकृषीखरीप हंगाम २०२६-२७ : शासकीय धान्य खरेदीसाठी समान गुणवत्ता निकष

खरीप हंगाम २०२६-२७ : शासकीय धान्य खरेदीसाठी समान गुणवत्ता निकष

नांदेड जिल्ह्यात बिलोली, मुखेड व किनवटमध्ये खरेदी केंद्रे; धान्य स्वच्छ, कोरडे व दर्जेदार आणण्याचे आवाहन

नांदेड| खरीप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत धान, तांदूळ, ज्वारी, मका व अन्य तृणधान्यांच्या शासकीय खरेदीसाठी केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एकसमान गुणवत्ता निकष निश्चित केले आहेत. या निकषांची पूर्तता करणारेच धान्य नांदेड जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्याची योग्य स्वच्छता करून ते पूर्णपणे वाळवूनच खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

धानासाठी चांगला व्यापारी दर्जा, स्वच्छता, कोरडेपणा तसेच दाण्यांचा एकसमान रंग व आकार अपेक्षित आहे. धानामध्ये बुरशी, कीड, दुर्गंधी, अपायकारक पदार्थ तसेच मेक्सिकन पॉपी व खेसारी यांसारख्या अशुद्धी नसणे आवश्यक आहे. ग्रेड ‘अ’ धानासाठी दाण्यांचे लांबी-रुंदी गुणोत्तर २.५ किंवा त्यापेक्षा अधिक, तर सामान्य श्रेणीसाठी २.५ पेक्षा कमी असणे आवश्यक असून धानातील आर्द्रतेचे प्रमाण कमाल १७ टक्के असावे.

तांदळासाठी आर्द्रतेची स्वतंत्र मर्यादा – तांदळामध्ये आर्द्रतेचे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत असल्यास कोणतीही मूल्यकपात केली जाणार नाही. १४ ते १५ टक्के आर्द्रता असल्यास नियमानुसार मूल्यकपात करून खरेदी केली जाईल. मात्र, १५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेला तांदूळ स्वीकारला जाणार नाही. तांदूळ स्वच्छ, कोरडा आणि मानवी वापरासाठी सुरक्षित असणे आवश्यक आहे.

ज्वारीसाठी आर्द्रतेची कमाल मर्यादा १३ टक्के, मक्यासाठी १४ टक्के, तर दुय्यम तृणधान्यांसाठी १३ टक्के निश्चित करण्यात आली आहे. परकीय पदार्थ, अन्य अन्नधान्य, खराब किंवा रंग बदललेले दाणे याबाबतही शासनाने निश्चित केलेल्या मर्यादांचे पालन करावे लागणार आहे. धान्याची गुणवत्ता तपासणी, नमुना घेणे आणि विश्लेषण भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) निर्धारित मानकांनुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीपूर्वी धान्याची स्वच्छता आणि योग्य वाळवणूक करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तीन तालुक्यांत शासकीय खरेदी केंद्रे – नांदेड जिल्ह्यात बिलोली, मुखेड आणि किनवट या तीन तालुक्यांत शासकीय धान्य खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे. बिलोली : बिलोली तालुका खरेदी-विक्री संघ, कासराळी मुखेड : बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था, बेरळी खु. ही दोन्ही केंद्रे मार्केटिंग फेडरेशन जिल्हा कार्यालय, नांदेड यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहेत. किनवट : शासकीय धान्य गोदाम, चिखली, जलधारा, सारखणी हे केंद्र महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक, प्रादेशिक कार्यालय यवतमाळ यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.

अडचणी असल्यास संपर्काचे आवाहन – धान्य खरेदी, गुणवत्ता निकष, वजनमापे, ऑनलाइन नोंदणी किंवा देयकाबाबत अडचण अथवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड कार्यालयाशी ०२४६२-२३२५२१ या क्रमांकावर किंवा Dsonanded1@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments