Homeकृषीहिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात ७५ वर्षीय शेतकऱ्याचा अपमान केल्याचा आरोप

हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात ७५ वर्षीय शेतकऱ्याचा अपमान केल्याचा आरोप

बोरगडी येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्याच्या कामातील कथित गैरप्रकार; राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांचा पाठपुरावा

हिमायतनगर, प्रतिनिधी| भूमी अभिलेख कार्यालय, हिमायतनगर येथे बोरगडी येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी अतिरिक्त २० हजार रुपयांची मागणी करून पैसे घेतल्याचा, तसेच पैसे दिल्यानंतरही संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने ते पैसे घेतले नसल्याचे सांगत एका ७५ वर्षीय शेतकऱ्याशी बुटाने मारण्याची भाषा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्तुळात संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी भूमिभिलेख कार्यालयात अनेक शेयकऱ्यांना घेऊन धडक देत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगडी येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी संबंधित शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयात प्रक्रिया केली होती. अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि ती रक्कम घेतली गेल्याचा आरोप संबंधित वृद्ध शेतकऱ्याने केला आहे. मात्र, नंतर संबंधित व्यक्तीने पैसे घेतले नसल्याचे सांगत वृद्ध शेतकऱ्याशी अर्वाच्य व अपमानास्पद पद्धतीची भाषा वापरत अपमानित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एकीकडे शासन शेतकऱ्यांना न्याय, सन्मान आणि पारदर्शक प्रशासन देण्याची भूमिका मांडत असताना, दुसरीकडे शासकीय कार्यालयातच ७५ वर्षीय शेतकऱ्याला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळत असल्यास ही गंभीर बाब आहे. वृद्ध शेतकरी हा प्रशासनाचा त्रास सहन करण्यासाठी नसून, त्याला न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी व्यक्त केली.

या प्रकरणातील भूमिअभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अतिरिक्त पैशांची मागणी झाली का, रक्कम स्वीकारण्यात आली का तसेच वृद्ध शेतकऱ्याशी अपमानास्पद भाषा वापरण्यात आली का, याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

“वृद्ध शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका वामनराव पाटील वडगावकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत भूमी अभिलेख विभागाची अधिकृत बाजू समोर आली नाही.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments