Homeनांदेडजिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, उपाध्यक्षपदी डॉ. मीनलताई पाटील खतगावकर

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, उपाध्यक्षपदी डॉ. मीनलताई पाटील खतगावकर

नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निर्वाचित झालेले आमदार डॉ. तुषार राठोड तसेच उपाध्यक्षपदी निर्वाचित झालेल्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुष्पगुछ देऊन  अभिनंदन केलं. शेतकरी आणि बँकेच्या सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा बँकेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि सभासदांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून बँकेच्या कामकाजाला अधिक गतिमानता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड आणि उपाध्यक्षपदी डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments