Homeकृषीधाराशिवमध्ये १५ कृषी अधिकारी निलंबित; हिमायतनगरमध्ये चौकशीला 'ब्रेक' का?

धाराशिवमध्ये १५ कृषी अधिकारी निलंबित; हिमायतनगरमध्ये चौकशीला ‘ब्रेक’ का?

कृषी विभागातील कथित गैरव्यवहारांवर वामनराव पाटील वडगावकर यांचा थेट सवाल; जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीची तातडीने चौकशी करण्याची मागणी

हिमायतनगर, अनिल मादासवार| धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता हिमायतनगर तालुक्यातील कृषी विभागाच्या कामकाजावरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी हिमायतनगर कृषी विभागातील योजनांची, निविदांची, अनुदान वितरणाची आणि शेतकरी प्रशिक्षणाच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वडगावकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या नावावर विविध माध्यमातून येणाऱ्या निधीचा गैरवापर झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “धाराशिवमध्ये चौकशी होऊन कारवाई होऊ शकते, तर हिमायतनगरमध्ये निष्पक्ष चौकशी का होऊ नये?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी विभागातील विविध योजना, निविदा प्रक्रिया, शेतकरी प्रशिक्षण, मार्गदर्शन, अनुदान आणि निविष्ठा वितरणात अनियमितता झाल्याचा संशय असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

दोषी अधिकारी कोणत्याही पदावरील असो, त्यांच्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, हिमायतनगर कृषी विभागातील गैरव्यवहाराचे आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी केले असून, या आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments