HomeनांदेडShoddy work exposed! अल्प पाऊस आणि वाऱ्यातच कोसळले महावितरणचे विजेचे खांब; निकृष्ट कामाचा पर्दाफाश! 

Shoddy work exposed! अल्प पाऊस आणि वाऱ्यातच कोसळले महावितरणचे विजेचे खांब; निकृष्ट कामाचा पर्दाफाश! 

हिमायतनगर-इस्लापूर मार्गावरील प्रकार;  ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी, चौकशीची जोरदार मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर-इस्लापूर मार्गावरील हिमायतनगर हद्दीतील शेतकरी  राजदत्त रामराम सूर्यवंशी यांच्या गट  क्रमांक १५३ मधील महावितरणच्या विजेच्या खांबांच्या कामातील  कथित निकृष्ट दर्जा उघड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकतेच उभारण्यात  आलेले तीन विजेचे खांब अल्प पाऊस आणि हलक्या वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाले,  तर आणखी  काही खांब धोकादायकरीत्या झुकल्याने  परिसरात भीतीचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नांदेड येथील कंत्राटदारामार्फत हे काम करण्यात आले. मंजूर डीपीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडून मोठा  खर्च करूनही काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अवघ्या काही दिवसांतच खांब कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेत खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, सुदैवाने त्या वेळी शेतात कोणताही शेतकरी, मजूर किंवा जनावरे नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच शेतात कोसळलेले विजेचे खांब तातडीने उभे करून संभाव्य धोका दूर करावा, अशी मागणी शेतकरी राजदत्त सूर्यवंशी यांनी केली आहे.

IMG20260806164742 01 Shoddy work exposed! अल्प पाऊस आणि वाऱ्यातच कोसळले महावितरणचे विजेचे खांब; निकृष्ट कामाचा पर्दाफाश! 
oplus_16

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मीराशे यांनी हिमायतनगर तालुक्यात महावितरण विभागामार्फत झालेल्या सर्व विजेच्या खांबांच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह अशा कामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणामुळे महावितरणच्या कामकाजातील गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभाग याची दखल घेऊन काय कारवाई करतो, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे  लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments