HomeकरियरOnline registration : फेब्रुवारी-मार्च 2027 च्या 10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांच्या फॉर्म क्र. 17 ची ऑनलाइन नोंदणी सुरू 

Online registration : फेब्रुवारी-मार्च 2027 च्या 10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांच्या फॉर्म क्र. 17 ची ऑनलाइन नोंदणी सुरू 

नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांच्या फॉर्म क्र. 17 द्वारे ऑनलाईन नावनोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

फेब्रु-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद नमूद केलेल्या केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत शनिवार 1 ऑगस्ट ते बुधवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.

विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पाहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत (प्रति विद्यार्थी शंभर रुपये) गुरुवार 1 ऑक्टोबर ते गुरुवार 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे.

विद्यार्थ्यांनी अतिविलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून मूळ अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत (प्रति विद्यार्थी प्रति दिन रु. 20) शुक्रवार 16 ऑक्टोबर ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. नियमित, विलंब, अतिविलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या या तारखा आहेत.

खाजगी विद्याथ्र्यांना इ. 10 वी व इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी, इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज त्यांच्या यापूर्वी शिकलेल्या शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामधून भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी त्यांनी मागील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी व परराज्यातील, परदेशातील विद्यार्थ्यांने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या रहिवासी दाखल्यावरील पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Comer या option चा बापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड,  स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा, ऑनलाईन अर्ज भरताना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर,मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील इ. दहावी व बारावीसाठी रुपये 1 हजार 110 नाव नोंदणी शुल्क + शंभर प्रक्रिया शुल्क. तर 100 रुपये विलंब शुल्क प्रति विद्यार्थी व 20 रुपये अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रति दिन राहील.

इ. 10 वी / 12 वी फेब्रु-मार्च 2027 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. 17) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPL/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोहोचपावती विद्यार्थी / संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या Login मध्ये प्राप्त होईल.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांनी त्याच्या यापूर्वी शिकलेल्या माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे . या माध्यमिक शाळेने परीक्षेचे आवेदनपत्र अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक / तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.

ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शाळेचे उच्च माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे . या उच्च माध्यमिक शाळेने आवेदनपत्र अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक / तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र / युडीआयडी कार्डची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ / माध्यमिक महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. 5 वी किंवा इ. 8 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. 10 वी साठी ( 17 नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल. ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments