HomeनांदेडSDRF : शेळगाव थडी येथे एसडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

SDRF : शेळगाव थडी येथे एसडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

नांदेड| धर्माबाद तालुक्यातील शेळगाव थडी येथील हनुमान मंदिर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), धुळे यांच्या सहकार्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणात स्थानिक शोध व बचाव पथकांसह विद्यार्थी आणि नागरिकांना आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजना व शोध-बचाव कार्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. आपत्तीच्या प्रसंगी स्थानिक पथकांना प्रभावीपणे कार्य करता यावे, तसेच विद्यार्थी व नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी, हा प्रशिक्षणाचा उद्देश होता.

एसडीआरएफ धुळे तुकडी क्रमांक १ चे रेस्क्यू टीम कमांडर तथा पोलीस निरीक्षक रघुनाथ पवार, उपपोलीस निरीक्षक सुरेश संकपाळ यांच्यासह सुरेश बगाड, राहुल आवचार आणि ३३ प्रशिक्षित बचावकर्त्या जवानांनी विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये शोध व बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे गौरव तिवारी, बारकुजी मोरे, उपविभागीय अधिकारी धनंजय राऊत, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले. धर्माबाद आणि कुंडलवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे स्थानिक पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments