नशामुक्त युवा–विकसित भारत अभियानांतर्गत 1 ऑगस्टला नांदेडमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा

NNL Team
By NNL Team
Oplus_16908288

नांदेड| भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत आणि जिल्हा युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 1 ऑगस्ट 2026 रोजी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे होणार आहेत.

जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी अश्नी कानकटे यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत रील/लघुपट, संगीत/रॅप, थीम आधारित नृत्य, नुक्कड नाटक (पथनाट्य), स्लॅम पोएट्री, चित्रकला, घोषवाक्य लेखन तसेच वक्तृत्व व वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी MY Bharat पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. संबंधित लिंकद्वारे युवक-युवतींना नोंदणी करता येणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, माय भारत स्वयंसेवक तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, नांदेड यांनी केले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!