नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना व उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ७ जुलै वन महोत्सवानिमित्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एम.के. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरामध्ये अत्यंत दुर्मिळ व औषधीसाठी उपयुक्त असणारे दोन पानांच्या ‘पळस’ चे वृक्षारोपण करण्यात आले.
दोन पानांचे औषधी पळस रोप हे किनवट भागातुन किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवाशी विकास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्यामार्फत विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रामदास पेदेवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, सिस्टीम एक्सपर्ट शिवलिंग पाटील, सुनील जाधव, सुधाकर शिंदे, हरीश पाटील, शिवाजी कल्याणकर, पांडुरंग सूर्यवंशी, संभाजी धनमने, अजमेर बिडला तसेच संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.