HomeनांदेडGanpat Shinde : होमगार्ड गणपत शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

Ganpat Shinde : होमगार्ड गणपत शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

कंधार, सचिन मोरे | कंधार शहरातील राम रहीम नगर येथील रहिवासी व कंधार पोलीस स्टेशन येथे होमगार्ड या पदावर कार्यरत असलेले जवान माधव गणपत शिंदे वय ४९ वर्ष यांचे दिनांक १८ मार्च २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत होमगार्ड माधव शिंदे हे दिनांक १८ मार्च २०२६ रोजी कंधार पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावून सायंकाळी आपले राहते घरी राम रहीम नगर येथे गेले असता मध्ये रात्रीच्या सुमारास शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मयत माधव शिंदे (होमगार्ड) यांचे पश्चात पत्नी, दोन मुले , आई असा परिवार असून मयत माधव शिंदे हे घरातील कुटुंब प्रमुख होते.

मयत शिंदे यांच्यावर दि.२१ मार्च २०२६ रोज शनिवारी दुपारी १२:०० वाजता हिंदू स्मशानभूमी कंधार येथे दुपारी १२:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कंधारचे प्रभारी पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, बीट जमादार धोंडीबा चोपवाड, तालुका समादेशक राजकुमार कदम, तालुका समादेशक खेडकर, फलटण नायक गृह रक्षक दलाचे शिवाजी गवळे, भीमराव जोंधळे, रघुनाथ करेवाड, भानुदास केंद्रे यांच्यासह गृह रक्षक दलातील महिला – पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments