Wednesday, May 13

A drop of relief : “तापत्या उन्हात जीवाला थेंबभर दिलासा…”

तापत्या उन्हाच्या झळा फक्त माणसांनाच नाही, तर निसर्गातील मुक्या जीवांनाही तेवढ्याच तीव्रतेने जाणवत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याचा एक थेंबही त्यांच्या जगण्यासाठी अमृत ठरत आहे.

याच जाणिवेतून पक्षी मित्रांनी आपल्या घराच्या अंगणात, परसबागेत आणि गच्चीवर मातीच्या भांड्यात पाण्याची सोय करण्यास सुरुवात केली. हळूहळू पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले, थेंबभर पाण्याने आपली तहान भागवू लागले — आणि या छोट्याशा उपक्रमाने निसर्गाशी एक जिव्हाळ्याचं नातं पुन्हा जुळू लागलं.

आजच्या या दिवशी प्रत्येकाने आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, हीच एक छोटी पण मोलाची मानवतेची कृती ठरेल. पक्षी मित्र छायाचित्रकार विजय होकर्णे नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!