HomeनांदेडDeputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २९...

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २९ मार्च रोजी लोह्यात राज्यस्तरीय शेतकरी मेळावा

लोहा| शेतकरी प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकाराने २९ मार्च रोजी लोहा येथे राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी गेल्या तीन-चार दशकांपासून संघर्ष करणाऱ्या शंकरअण्णा धोंडगे यांनी काही महिन्यांपूर्वी आपला एमआरएस पक्ष शिवसेना मध्ये विलीन केला आहे. त्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यास सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, अनेक जण पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोहा शहरातील हळदव रोडवरील मैदानावर सायंकाळी हा मेळावा होणार असून, यावेळी राज्यातील अनेक मंत्री व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी आमदार धोंडगे पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले असून, आगामी काळात मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चिखलीकर, धोंडगे, भोसीकर आणि वंचित अशा विविध राजकीय प्रवाहांमध्ये पुन्हा वैचारिक लढत रंगण्याची चर्चा सुरू आहे.


बॉक्स : राजकीय घडामोडींना वेग

अनेक कार्यकर्ते व नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार, शंकरअण्णा धोंडगे पुन्हा सक्रिय, पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, पत्रकार परिषद लोहा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी दत्ता पाटील पवार, दिलीप दादा धोंडगे, शिवराज पाटील धोंडगे, मारोती पंढरे, नागोराव उमरेकर, संतोष पाटील यंडाळे, नंदाजी इंगळे, जीवन पाटील वडजे, पिंटू माळवदे, अमन पेटकर आदी उपस्थित होते.

जुने सहकारी पुन्हा एकत्र?

गेल्या दोन दशकांपासून या भागात विविध नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे जुने सहकारी पुन्हा त्यांच्या सोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments