Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २९ मार्च रोजी लोह्यात राज्यस्तरीय शेतकरी मेळावा
लोहा| शेतकरी प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकाराने २९ मार्च रोजी लोहा येथे राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी गेल्या तीन-चार दशकांपासून संघर्ष करणाऱ्या शंकरअण्णा धोंडगे यांनी काही महिन्यांपूर्वी आपला एमआरएस पक्ष शिवसेना मध्ये विलीन केला आहे. त्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यास सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, अनेक जण पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोहा शहरातील हळदव रोडवरील मैदानावर सायंकाळी हा मेळावा होणार असून, यावेळी राज्यातील अनेक मंत्री व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी आमदार...
